मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी कोव्हिड भत्ता द्या’

| Updated on: Oct 28, 2020 | 5:45 PM

मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेचे कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदान व कोव्हिड भत्ताबाबत महापालिका अधिकारी आणि युनियनचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी कोव्हिड भत्ता द्या
mayor kishori pednekar
Follow us on

मुंबई : जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कंत्राटी कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत असून त्यांचा मार्च 2020 पासून प्रलंबित असलेला कोव्हिड भत्ता दिवाळीपूर्वी देण्यात यावा, असे निर्देश मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेचे कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदान व कोव्हिड भत्ताबाबत महापालिका अधिकारी आणि युनियनचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. (Give covid allowance to contract employees of Mumbai District Tuberculosis Control Institute before Diwali said by kishori pednekar)

भायखळा इथल्या महापौर निवासस्थानी आज 28 ऑक्टोबर 2020 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना महापौर किशोर पेडणेकर यांनी यासंबंधी निर्देश दिले आहेत. या बैठकीला उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य)(प्र.) देविदास क्षिरसागर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे तसेच संबंधित अधिकारी आणि युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

महापौर किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या की, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेत 1999 पासून संबंधित अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. कोव्हिड-19 च्या काळामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे कोव्हिड भत्ता देण्यात आला त्याप्रमाणेच या कर्मचाऱ्यांना सुद्धा भत्ता देण्यात यावा. बऱ्याच दिवसापासून हा विषय प्रलंबित असून आता यामध्ये अधिक वेळ न घालवता दिवाळीपूर्वी या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळण्याबाबतची कारवाई तातडीने करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

याचप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याबाबतच्या विषयाबाबत महापालिका आयुक्तांसोबत चर्चा केली असून यावर्षी या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतचे बजेट हेड सुरू करण्याबाबतचे पत्र देण्याचे निर्देशही महापौरांनी दिले. जेणेकरून पुढच्या वर्षी या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळणे सोयीचे होऊ शकेल, असे महापौरांनी यावेळी सांगितले.

इतर बातम्या – 

मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी शंभरीपार

गुगल, फेसबुक आणि ट्विटरला झटका; राजकीय जाहिरातींवर बंदी, अमेरिका निवडणुकीपूर्वी दणका

(Give covid allowance to contract employees of Mumbai District Tuberculosis Control Institute before Diwali said by kishori pednekar)