मुंबई मनपातील सफाई कामगारांना मालकी हक्काची घर द्या, रामदास आठवलेंची मागणी 

| Updated on: Feb 22, 2021 | 11:39 PM

मुंबई मनपाच्या 3 हजार सफाई कामगारांना त्यांच्या मालकी हक्काचे घर द्या. (Give House to BMC Cleaning Workers)

मुंबई मनपातील सफाई कामगारांना मालकी हक्काची घर द्या, रामदास आठवलेंची मागणी 
रामदास आठवले, केंद्रीय मंत्री
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिकेतील 25 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सफाई कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेतून त्यांच्या मालकी हक्काची घरे देण्याची राज्यसरकारची योजना आहे. ही योजना म्हाडाद्वारे मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व महापालिकांमध्ये राबवावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. (Give House to BMC Cleaning Workers demand Ramdas Athawale)

सफाई कामगारांना त्यांच्या मालकी हक्काचे घर मिळवून देण्यासाठी म्हाडा, मनपा आणि सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे एकत्रित प्रयत्न करण्यात येईल. त्यासाठी मी स्वत: पुढाकार घेणार आहे, असेही आठवलेंनी सांगितले.

आज म्हाडा कार्यालयात झालेल्या बैठकीत मुंबई मनपाच्या 3 हजार सफाई कामगारांना त्यांच्या मालकी हक्काचे घर द्या, अशी मागणी म्युनिसिपल मजदूर संघाचे सरचिटणीस प्रकाश कमलाकर जाधव यांनी केली. त्यावर झालेल्या चर्चेत रामदास आठवले सहभागी झाली होते. यावेळी देशातील सर्व महापालिकेतील सफाई कामगारांना त्यांच्या मालकी हक्काचे घर मिळावे यासाठी संयुक्त बैठक घेऊ. यात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय, राज्य शासन, स्थानिक मनपा प्रशासन आणि गृह निर्माण विभाग म्हाडा हे सहभागी असतील, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.

“घरांच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणार”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत सर्वाना घर देण्याची घोषणा केली होती. यानंतर देशभरातील सर्वच राज्यात मोठ्या प्रमाणात सरकारी आणि खाजगी गृहनिर्माण उद्योगात वेग आला. महाराष्ट्रात सर्वाधिक घरे बांधण्यात आली आहेत. मात्र मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगरासह संपूर्ण राज्यातील गरीब, सर्वसामान्यांना नियमानुसार त्यांच्या हक्काचे घर मिळावे, यासाठी रामदास आठवले आक्रमक झाले आहेत. या लोकांच्या घरांचा प्रश्न निकाली निघावा म्हणून सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

मुंबई, महारष्ट्रासह देशांतील प्रत्येक नागरिकाला घर मिळाले पाहिजे. केंद्र सरकारची तशी योजना हॆ आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील गोरगरीब, सर्वसामान्य आणि मध्येमवर्गाला त्याचे हक्काचे घर त्याला मिळाले पाहिजे. त्यामुळे म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसनातील सर्व नागरिकांना घरे मिळाली पाहिजेत. म्हाडाच्या सर्व मंडळातील योजनेतील घरे लाभार्थीना मिळाली पाहिजेत. बीडीडी, धारावी सारखे प्रकल्प आणि शिवालिक बिल्डर झोपू योजनेसारखी अनेक योजनेतील रखडलेली घरे नागरिकांना मिळाली पाहिजेत. तो त्यांच्या अधिकार आहे. ही घरे नागरिकांना मिळावी मी स्वतः सातत्याने पाठपुरावा करणार आहे. घर हा जिवाहाळ्याचा आणि जगण्याचा अत्यंत महत्वाचा विषय आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी मी आक्रमक राहीन, असे ही आठवले यांनी जाहीर केले.

म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना हक्काची घरं द्या, कामगार संघटनांची मागणी 

राज्य सरकारचा महत्वकांक्षी बीडीडी प्रकल्प रखडला असल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केल्या. तर खार जव्हारनगर आंबेवाडी शिवालिक बिल्डरने घरे दिली नाहीत. या रहिवाशांना बिल्डर भाडे देत नाही घरे ही देत नाही असे हि प्रश्न बैठकीत आले. तर म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना हक्काची घरे म्हाडाने द्यावी, पेन्शन द्यावी असा प्रश्न कामगार संघटनांनी मांडला.

तर मुंबईतील सफाई कामगारांना मोफत घर मिळण्यासाठीची योजना तात्काळ राबविण्यात यावी, मुंबईतील आणि इतर ठिकाणच्या रखडलेल्या झोपू योजना मार्गी लावण्यात याव्या. धारावीचा रखडलेला पुनर्विकासाला तात्काळ गती द्यावी. तसेच म्हाडातील विविध मंडळातील गृहनिर्माण योजना मार्गी लावाव्यात. अडचणीत असलेलया गृहनिर्माणाबाबत अनेक प्रश्न या बैठकीत मांडण्यात आल्या. यावर विविधांगाने चर्चा झाली. (Give House to BMC Cleaning Workers demand Ramdas Athawale)

संबंधित बातम्या : 

बुलडाणा जिल्हा प्रशासनाकडून नियमावलीत बदल, सुधारित आदेश जारी

मंत्रालयातील पासवर निर्बंध आणा, मंत्रालय अधिकारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र