AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूबाबत ठाकरेंची शंका… पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

उद्धव ठाकरेंनी गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत पुन्हा शंका व्यक्त केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरेंकडे काही वेगळी माहिती असल्यास ती तपास यंत्रणांना द्यावी, चौकशी केली जाईल, असे पंकजा म्हणाल्या.

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूबाबत ठाकरेंची शंका... पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
pankaja mundeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 2:37 PM
Share

गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचे रहस्य अद्याप उलगडले नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मुंडे एक दिवसही मंत्री म्हणून लोकसभेच्या सभागृहात जाऊ शकले नाही. काल रात्री बोलतात काय, आज सकाळी बातमी काय येते. त्यांचा मृत्यू रहस्यमय आहे, अशी शंकाच उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूवरून चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यावर राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे काही वेगळी माहिती असेल तर त्यांनी द्यावी. त्याची चौकशी केली जाईल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मंत्री पंकजा मुंडे यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबतची काही वेगळी माहिती असेल तर त्यांनी द्यावी. त्याचा तपास केला जाईल. याप्रकरणी मी मागणी केली होती. त्यावेळी चौकशी झाली. मुंडे साहेबांबाबत काही वेगळं झालं असं मला कुटुंब म्हणून वाटत नाही. आता तर काही आढळत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

तोपर्यंत बोलू नये

यावेळी त्यांनी दिशा सालियन प्रकरणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. दोन्ही विषय गंभीर आहेत. त्यावर टिप्पण्णी करणं योग्य नाही. चौकशी यंत्रणा योग्य निर्णय घेतील तोपर्यंत आपण निकाल लावू नये. तपास यंत्रणेच्या बाबत काही टिप्पण्णी करु नये, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, असं पंकजा यांनी स्पष्ट केलं.

योग्य वेळीच निवृत्ती

पंकजा मुंडे यांचं निवृत्तीबाबतचं एक विधान मध्यंतरी चर्चेत आलं होतं. त्यावरही त्यांनी पुन्हा एकदा खुलासा केला आहे. मी निवृत्ती विषयी बोलत नव्हते. 24 वर्ष मी काम करत आहे. तेच रस्ते, तेच पीए आहेत. मी योग्य वेळीच निवृत्त होईल. आता त्याची गरज नाही. माझं काम संपलंय असं मला वाटत नाही, असंही त्या म्हणाल्या.

मीही जेनजीची आई

जेनजीबद्दलही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका बाजूला महिला आणि युवा आहेत. जेनजी आणि अल्फा आपलं फ्युचर आहे. मी सुद्धा एका जेनजीची आई आहे. या पिढीला पुढे नेणं हे आमचं कर्तव्य आहे, असं त्या म्हणाल्या.

फडणवीस प्रत्येक पोस्टसाठी योग्य

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार का? असा सवाल केला असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. यावर बोलण्याबाबत मी अजून लहान आहे. देवेंद्र फडणवीस अजूनही पुढे जावेत. ते प्रत्येक पोस्टसाठी योग्यच आहेत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?