ग्रामपंचायतींचा गुलाल उधळला, पण 31 मार्चपर्यंत ग्रामसभा नाही! कारण काय?

ग्रामसभांवर 31 मार्चपर्यंत स्थगिती देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती खुद्द ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:42 PM, 19 Jan 2021
ग्रामपंचायतींचा गुलाल उधळला, पण 31 मार्चपर्यंत ग्रामसभा नाही! कारण काय?

मुंबई : राज्यातील 14 हजाराहून अधिक ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. सोमवारी या ग्रामपचायंतींचा गुलालही उधळला गेला. मात्र ग्रामसभांवर 31 मार्चपर्यंत स्थगिती देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती खुद्द ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. कोरोना महामारींमुळे ग्रामपंचायत निवडणूक लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र एका प्रशासकाकडे जास्त गावांचा कारभार देण्यात आला होता. आता एकच प्रशासक 4-5 ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे ग्रामसभांवर 31 मार्चपर्यंत स्थगिती देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्र्यांनी दिली आहे.(state government intends to postpone the Gram Sabha till March 31)

‘आरक्षण रद्द केल्यानं निवडणुका व्यवस्थित पार पडल्या’

ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी सरपंचपदाचं आरक्षण काढण्यात आलं. आता निवडणुकांनंतरच सरपंचपदाचं आरक्षण जाहीर केलं जाईल असं ग्रामविकासमंत्र्यांनी जाहीर केलं. सरकारच्या या निर्णयामुळेच आता निवडणुका चांगल्या पद्धतीनं पार पडल्याचा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत निर्णय का?

आतापर्यंत महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच सरपंचपदाची सोडत जाहीर होत होती. पण सरपंचपदासाठी होणारा घोडेबाजार आणि खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढवण्याचे प्रकार वाढल्यामुळेच नवा निर्णय घेण्यात आला. त्यामुळेच 14 हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचांची आरक्षण सोडत जानेवारीमध्ये काढण्यात येणार असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी अव्वल, काँग्रेस चौथी!- जयंत पाटील

ग्रामपंचायत निवडणुकीतील निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले आहेत. त्यात आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही उडी घेतली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अव्वल ठरली असून काँग्रेस चौथ्या क्रमांकावर असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.  माझ्याकडेही प्रत्येक जिल्ह्याची माहिती आहे. 13, 295 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यात राष्ट्रवादीला 3 हजार 276 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला 2 हजार 406, भाजप 2 हजार 942 आणि काँग्रेसला 1 हजार 938 जागा मिळाल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकावर आणि भाजप तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर असल्याचं पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या :

जयंत पाटील म्हणतात, ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी अव्वल, काँग्रेस चौथी!

Pandharpur Garmpanchayat election : गुलाल लागला, पठ्ठ्यानं 20 कि.मी. दंडवत घातला, पंढरपुरातून एक नंबर बातमी

state government intends to postpone the Gram Sabha till March 31