Gunratna Sadavarte: कबुल, कबुल, कबुल! गुणरत्न सदावर्तेंनी 1, 44,00000 एवढे पैसे एस.टी. कर्मचाऱ्यांकडून घेतले? हिशेब वाचा

शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाप्रकरणी (St Worker Protest) युक्तीवाद झाला. या युक्तीवादात सरकारी वकील प्रदीप घरत यांनी काही खळबळजनक दावे गेले आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयाला लुटल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Gunratna Sadavarte: कबुल, कबुल, कबुल! गुणरत्न सदावर्तेंनी 1, 44,00000 एवढे पैसे एस.टी. कर्मचाऱ्यांकडून घेतले? हिशेब वाचा
गुणरत्न सदावर्तेंनी एकूण किती पैसे घेतल्याची कबुली दिली?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 5:24 PM

मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे या केसमध्ये खलबळजनक दावे समोर येत आहे. सध्या गुणरत्न सदावर्तेंचा कोठडी प्रवास मुंबई ते कोल्हापूर, मध्येच मुक्काम सातारा असा झाला आहे. त्यांना बीड पोलीस, आणि सोलापूर पोलीस, आणि पुणे पोलीसही ताब्यात घेण्याची शक्यता आहे. कारण सदावर्तेंवर राज्यातल्या अनेक जिल्ह्यात विविध प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे मुंबईत त्यांच्या शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाप्रकरणी (St Worker Protest) युक्तीवाद झाला. या युक्तीवादात सरकारी वकील प्रदीप घरत यांनी काही खळबळजनक दावे केले आहेत. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयाला लुटल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यातून अनेक ठिकाणी मालमत्ता घेतल्याचाही आरोप करण्यात आलाय. यात जवळपास 1 कोटी 80 लाखाच्या आसपास सदावर्तेंनी रक्कम गोळा केल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तर दुसरीकडे सदावर्ते यांनी पैसे घेतल्याची कबुली दिल्याचा दावाही केला आहे. ती रक्कम पाहूनही अनेकांचे डोळे पाढरे होतील.

सदावर्तेंनी घेतलेली एकूण रक्कम किती?

गुणरत्न सदावर्ते यांनी दिलेल्या कबुली जबाबात जवळपास चाळीस हजार एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा दावा करण्यात आलाय. त्यात प्रत्येक एस.टी.कर्मचाऱ्यांकडून दोनशे ते तीनशे रुपये घेतले, हे सदावर्तेंनी कबूल केले आहे, असा दावा सरकारी वकीलांनी केला आहे. या अंदाजित रक्कमेचा जर आपण हिशोब लावला तर ही रक्कम तब्बल 1, 44,00000 एवढी होत आहे. अनेकांना हा आकडा वाचणेही कठीण झाले असेल, तरी सोप्या शब्दात बोलायचे झाल्यास सदावर्तेंनी तब्बल 1 कोटी 44 लाख घेतल्याचा कबुली जबाब दिल्याचा दावा करण्यात आलाय. एवढी मोठी रक्कम ऐकूण तुम्हलाही धक्का बसला असले. मात्र हिशोब मारल्यास अंदाजित रक्कम एवढी होत आहे.

प्रदीप घरत आज काय म्हणाले?

आता या पैशातून सदावर्ते यांनी काय केलं? याबाबतही सरकारी वकीलांनी काही बाबी कोर्टासमोर आहे. यात सदावर्तेंच्याा अनेक मालमत्तांचा समावेश आहे. मलमत्तेची चौकशी केली आहे. ज्यामध्ये अनेक महत्वाच्या डायरी सापडल्या आहेत. त्यांनी हे पैसे फी म्हणून घेतल्याचे सांगितले. आधी त्यांनी म्हटले होते मी एक रूपयाही कामगाराकडून घेतला नाही, मात्र आज त्यांनी साक्ष बदलली आहे, असे सरकारी वकील म्हणाले आहेत.

कोणत्या मालमत्ता घेतल्याचा दावा

तसेच सदावर्ते यांनी मागच्या काही महिन्यात मुंबईच्या परळ आणि भायखळा परिसरात मालमत्ता खरेदी केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय. त्यामुळे या मालमत्ता एसटी कर्मचाऱ्यांनी सदावर्ते यांना दिलेल्या पैशातून त्यांनी खरेदी केल्या असाव्या असा पोलिसांना संशय आहे.सदावर्ते यांनी परळ आणि भायखळा येथील मालमत्ताबरोबरच केरळमधून एक मोठी गाडी 23 लाखला खरेदी केल्याचं विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात सांगितलंय. यात परेल परिसरात उरणवाला कंपाऊंडमध्ये सदावर्ते यांनी सदनिका घेतल्याची माहिती सरकारी वकीलांनी मांडली आहे.

Gunratna Sadavarte : होय, एस.टी.कर्मचाऱ्यांकडून दोनशे ते तीनशे रुपये घेतले, गुणरत्न सदावर्तेची कबूली, मर्जीनं पैसे घेतल्याचाही दावा

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना दिलासा, मात्र आता ताबा कोल्हापूर पोलिसांकडे! प्रकरण काय?

Gunratna Sadavarte: एकीकडे उसासा, दुसरीकडे दिलासा! सातारा जिल्हा सत्र न्यायालयाकडून सदावर्तेंना जामीन मंजूर

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.