आता प्रत्येक जिल्ह्यात कोरोना नियंत्रणाला वेग येणार, हसन मुश्रीफांकडून खर्चाबाबत ‘हा’ मोठा निर्णय

| Updated on: May 29, 2021 | 4:05 AM

आता 50 लाखांवरील खर्चाचे स्थायी समितीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

आता प्रत्येक जिल्ह्यात कोरोना नियंत्रणाला वेग येणार, हसन मुश्रीफांकडून खर्चाबाबत हा मोठा निर्णय
हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडणार?
Follow us on

मुंबई : “सद्यस्थितीत कोरोनामुळे राज्यात सर्वत्र जिल्हा परिषदांच्या अंतर्गत खरेदी समिती तथा स्थायी समिती बैठकांवर निर्बंध आहेत. त्यामुळे स्थायी समिती आणि जिल्हा परिषद यांना असलेले खर्चाचे अधिकार पुढील आदेश होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा खर्चाचा अधिकार केवळ कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या खरेदीसाठी असेल,” अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली (Hasan Mushrif comment on extra powers to ZP CEO to corona prevention work).

“आता 50 लाखांवरील खर्चाचे स्थायी समितीचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना”

हसन मुश्रीफ म्हणाले, “जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीस 50 लाख रुपयांपर्यंतचे तर जिल्हा परिषदेस 50 लाख रुपयांवरील खरेदीस मान्यता देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. पण सद्यस्थितीत कोरोनामुळे राज्यात सर्वत्र जिल्हा परिषदांच्या अंतर्गत खरेदी समिती तथा स्थायी समिती बैठकांवर निर्बंध आहेत. तथापी, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करणे महत्वाचे आहे. त्यामुळे संबंधित शासन निर्णयातील इतर सर्व तरतुदी कायम ठेवून स्थायी समिती आणि जिल्हा परिषद यांना असलेले खर्चाचे अधिकार पुढील आदेश होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

“मुख्य कार्यकारी अधिकचे अधिकार केवळ कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या खरेदीसाठी”

“मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले स्थायी समितीचे अधिकार केवळ कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या खरेदीसाठी आहेत. कोरोना प्रतिबंधविषयक बाबींची खरेदी करताना संबंधीत शासन निर्णय तसेच खरेदीसंदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयातील तरतुदींचा विचार करुन यथोचित कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय 27 मे रोजी जारी करण्यात आला आहे,” असंही मुश्रीफ यांनी नमूद केलं.

“15 व्या वित्त आयोगाचा 25 टक्के निधी ग्रामपंचायतींना विलगीकरण कक्ष उभारण्यास खर्च करता येणार”

हसन मुश्रीफ म्हणाले, “ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जलद गतीने निर्णय होण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये ग्रामीण नागरिकांच्या सुरक्षेसाठी ग्रामविकास विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पंधराव्या वित्त आयोगातील अबंधीत निधीमधील 25 टक्के निधी हा ग्रामपंचायत क्षेत्रात विलगीकरण कक्ष उभारण्यास खर्च करण्यासाठीही नुकतीच मान्यता देण्यात आली आहे.”

हेही वाचा :

कोरोना काळात हसन मुश्रीफांनी बहिणीसह जवळचे 4 नातेवाईक गमावले, नागरिकांना महत्वाचं आवाहन

चंद्रकांतदादांची सगळी ‘माया’ कुठंय हे मला ठाऊक : हसन मुश्रीफ

…तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला धोका नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

व्हिडीओ पाहा :

Hasan Mushrif comment on extra powers to ZP CEO to corona prevention work