राजकीय करिअर कसं संपवायचं एवढचं त्यांना माहीत, खासदार अरविंद सावंत यांचा हल्लाबोल

इथल्या निवडणुका प्रलंबित का होतायत. इकडंच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आदित्य ठाकरेंना बदनाम केलं जातं आहे.

राजकीय करिअर कसं संपवायचं एवढचं त्यांना माहीत, खासदार अरविंद सावंत यांचा हल्लाबोल
खासदार अरविंद सावंत
| Updated on: Dec 24, 2022 | 4:40 PM

मुंबई : खासदार अरविंद सावंत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. खासदार सावंत म्हणाले, खोके आणि सत्ता यापलीकडे या सरकारला काय पडलेलं नाही. एसआयटी लावून एखाद्याच राजकीय करियर कस संपवायचं एवढाच यांना माहितीय. 75 वर्षात जे झालं नाही ते आता काय होतंय. देवेंद्र फडणवीस यांनी मी बदला घेतला अशा शब्दाचा उल्लेख केला आहे. राज्य सरकार आता जे करत आहे ते स्वतःची कबर खोदतायत. उपमुख्यमंत्री यांनी एसआयटी नेमली तशीच जस्टीस लोयाच्या बाबतीत का नाही, असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी केला.
एसआयटी फक्त चुन चुन के लगाना हे नैतिकतेला धरून नाही. इथल्या निवडणुका प्रलंबित का होतायत. इकडंच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आदित्य ठाकरेंना बदनाम केलं जातं आहे.

बोम्मइ करत असलेले विधान हे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलं जातं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी याकडे लक्ष घालावं अशी विनंती त्यावेळी केली होती, असं अरविंद सावंत यांनी सांगितलं. त्यांचं डबल इंजनच सरकार आहे. त्यामुळं हे गांभिर्याने घेणं गरजेचं आहे. त्यांनी बेळगावच बेळगावी केलं. जणतंत्र जगलं पाहिजे असं पंतप्रधान सांगत असतात. मात्र मराठी भाषिकांवर सीमावर्ती भागात अन्याय होतोय.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार कुठल्या पातळीवर चाललं आहे, याची नोंद पंतप्रधान घेत आहेत की नाही, असा आरोपही अरविंद सावंत यांनी केला. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरूय. आरेच्या संदर्भात दिल्लीमध्ये एक संवाद झाला. त्यात हवामान बदल आणि नैसर्गिक संतुलनवर भाषणं झाली. त्यात भाजपाची नेते मंडळी आली होती.

लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही म्हणून सुब्रमण्यम स्वामी घरचा आहेर देतायत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच आहे. बाळासाहेबांनी दिलेले विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. सुब्रमण्यम स्वामी धाडसी विधान करण्यासाठी पटाईत आहेत.
हिंदुत्ववाद हा राष्ट्रवाद असायला पाहिजे.