Mumbai Dock Explosion : त्या एका चुकीमुळे मुंबईत झाला होता भयानक स्फोट, पुण्यापासून थेट सिमलाही हादरले

मुंबईच्या इतिहासात सर्वात मोठा एक भयंकर स्फोट घडला होता. त्या स्फोटाने अग्निशमन दलाच्या 66 जवानांचा बळी घेतला. अभिनेत्री मधुबाला हीचे घर या स्फोटाच्या आगीत खाक झाले होते. सातशे ते तेराशे लोक यावेळी ठार झाले होते. जखमींची तर खिजगणतीच नव्हती. जवानांच्या हौतात्म्यामुळे देशात दरवर्षी 14 एप्रिलला अग्निशमन सेवा सप्ताह साजरा केला जाता. मुंबईत काय घडले होते या दिवशी पाहुयात....

Mumbai Dock Explosion : त्या एका चुकीमुळे मुंबईत झाला होता भयानक स्फोट, पुण्यापासून थेट सिमलाही हादरले
MUMBAI DOCK BLAST
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Apr 15, 2024 | 12:43 PM

दुसरे जागतिक महायुद्ध 1939 मध्ये सुरु झाले होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यास चार वर्षे शिल्लक असताना साल 1944 मध्ये मुंबईत आजच्याच 14 एप्रिल रोजी मोठी दुर्घटना घडली. भारतावर इंग्रजांचे राज्य असल्याने दुसऱ्या महायुद्धात भारतातून ब्रिटनला सैन्य आणि सामुग्रीची वाहतूक मुंबई बंदरातून होत होती. त्यामुळे भारतातील प्रमुख बंदर असलेले मुंबई बंदर या सैनिकांच्या नेआण करण्यामुळे नेहमीच गजबजलेले होते. त्याकाळात मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा अपघात घडला. त्यामुळे अख्खी मुंबई आणि परिसर हादरला होता. मुंबईच्या बंदरात उतरलेल्या एका जहाजात हा भयंकर स्फोट झाला होता. त्यामुळे या स्फोटाचे हादरे पार पालघर, मुरुड जंजिरा आणि पुण्यापर्यंत बसले, इतकेच काय तर 1700 किमीवर असलेल्या सिमला येथील भुंकपमापक केंद्रात या हादऱ्यांची नोंद झाली होती. काय झाले होते ? 14 एप्रिल 1944 रोजी पाहूयात…. victoria dock blast area 1944 मध्ये इंग्लंडमधील बर्कल हेड बंदरातून s.s. फोर्ट स्टायकिन...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा