Holi 2021: ‘फक्त हिंदू सणांनाच ठाकरे सरकारची आडकाठी का; आम्ही होळी घरामध्ये पेटवायची का?’

| Updated on: Mar 28, 2021 | 10:53 AM

फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करुन होळीचा सण (Holi 2021) साजरा करण्यात काय गैर आहे? | BJP Ram Kadam Holi

Holi 2021: फक्त हिंदू सणांनाच ठाकरे सरकारची आडकाठी का; आम्ही होळी घरामध्ये पेटवायची का?
आम्ही घरामध्ये होळी पेटवायची का?
Follow us on

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुलिवंदनाच्या सणावर ठाकरे सरकारकडून लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. ठाकरे सरकार फक्त हिंदू सणांनाच आडकाठी का करते, असा सवाल भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी उपस्थित केला. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करुन होळीचा सण (Holi 2021) साजरा करण्यात काय गैर आहे? इतर धर्माच्या लोकांच्या सणांना परवानगी दिली जाते. ते लोक कोरोनाचे नातेवाईक आहेत का, याचे उत्तर वसुली सरकारने द्यावे, अशी टीका राम कदम यांनी केली. (BJP leader Ram Kadam slams Thackeray govt over curbs on Holi festival 2021)

राम कदम यांनी रविवारी ट्विट करत राज्य सरकारवर चांगलीच आगपाखड केली. धुलिवंदनाच्यावेळी गर्दी होते, एकमेकांना रंग लावताना स्पर्श होतो. त्यामुळे धुलिवंदनावर घालण्यात आलेले निर्बंध मी समजू शकतो. पण होळी सार्वजनिक ठिकाणी म्हणजे घराबाहेर पेटवू शकत नाही, असे ठाकरे सरकार म्हणते. मग आम्ही घरामध्ये होळी पेटवायची का? ठाकरे सरकारची अक्कल कुठे गेली आहे, असा सवालही राम कदम यांनी विचारला.

धुळवड खेळायला गेलात तर पोलिसांकडून कारवाई होणार

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारकडून होळी (Holi 2021) आणि धुळवडीच्या सणावर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा मुंबईत नेहमीप्रमाणे धुळवड साजरी करता येणार नाही. यानंतरही नागरिकांनी ऐकले नाहीच तर त्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल. (Holi Rangpanchmi festival in Mumbai rules and regulations)

अर्थात धुळवड घरातल्या घरात खेळता येईल पण चाळ किंवा इमारतीच्या आवारात सार्वजनिकरित्या एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आखून दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयांतर्गत पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रसंगी पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे.

काय आहेत नियम?

होळी, धुळवडीला सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. पालिकेने दोनच दिवसांपूर्वी तसे आदेश जाहीर केले आहेत. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागात पाच पथके तयार क ली आहेत. ही पथके फिरतीवर राहतील व तपासणी करतील. एखाद्या ठिकाणी नियमभंग होतो आहे असे आढळले तर समज दिली जाईल. मात्र त्यानंतरही लोकांनी ऐकले नाही तर पोलिसांची मदत घेतली जाईल व कारवाई के ली जाईल.

संबंधित बातम्या :

 

Holi 2021 | होळीचा शुभ मुहूर्त ते पौराणिक महती, जाणून घ्या सर्व काही
Holi 2021 Guidelines : राज्यात होळी, रंगपंचमी साजरी करण्यास मनाई, तुमच्या शहरातील नियम काय?
Holi 2021 | आयुष्यात आनंदाचा रंग हवा असेल तर तुमच्या राशीनुसार रंग निवडा आणि उत्साहात होळी साजरी करा…

(BJP leader Ram Kadam slams Thackeray govt over curbs on Holi festival 2021)