Holi 2021 | होळीचा शुभ मुहूर्त ते पौराणिक महती, जाणून घ्या सर्व काही

होळी म्हणजे रंगांचा सण, फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. (Holi Shubh Muhurat Holika Dahan Importance)

Holi 2021 | होळीचा शुभ मुहूर्त ते पौराणिक महती, जाणून घ्या सर्व काही
होळी

मुंबई : होळी म्हणजे रंगांचा सण, फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते. होळी या सणाला महाराष्ट्रात शिमगा या नावाने ओळखतात. तर उत्तर भारतात याला दोला यात्रा किंवा होरी असे म्हटले जाते. दक्षिण भारतात हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. (Holi Shubh Muhurat Holika Dahan Importance)

आ ज (28 मार्च) होळीच्या दिवशी होलिकादहन केले जाते. अशुभ गोष्टी होळीच्या अग्नीत जाळून नाश करायचे आणि चांगल्या शुभ गोष्टींचा स्वीकार करायचा, असा संदेश होळीच्या दिवशी दिला जातो. तर दुहोळी पौर्णिमा सऱ्या 29 मार्च रोजी हा उत्सव देशभर रंगांची उधळण करून धूलिवंदन साजरा केला जातो.

यंदाच्या होळीला तब्बल 499 वर्षानंतर दुर्मिळ योग

यावेळची होळी खूप खास असणार आहे. तब्बल 499 वर्षांनंतर होळीच्या निमित्ताने अत्यंत दुर्मिळ योग तयार होणार आहे. 29 मार्चच्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कन्या राशीत विराजमान होईल, तर शनि ग्रह स्वतःच्या राशीमध्ये राहील. असा ग्रह योगायोग 3 मार्च 1521 रोजी झाला होता. त्यामुळे होळीला 499 वर्षानंतर दुर्मिळ महायोग तयार होतो आहे. त्याशिवाय, यावेळी सर्वार्थसिद्धि योगात होळी साजरी करण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे अमृतासिद्धी योगही या दिवशी येणार आहे.

होळीसंबंधीची आख्यायिका

असे म्हटले जाते की, हिरण्यकश्यपने आपल्या मुलाच्या हत्येच्या उद्देशाने आपल्या मुलाचा आठ दिवस अनन्वित छळ केला होता. परंतु, भगवान विष्णूची अशी प्रल्हादावर इतकी कृपा होती की, प्रत्येक वेळी त्याचा या संकटातून बचाव झाला. आठव्या दिवशी प्रल्हादाची आत्या होलिका तिच्या मांडीवर प्रल्हादाघेऊन जळत्या अग्नीत बसली होती.

होळीकाला अग्नीने न जाळण्याचा आशीर्वाद दिला होता. परंतु, भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हादाचे प्राण पुन्हा वाचले आणि होलिकाच मरण पावली. तेव्हापासून दरवर्षी होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टकच्या वेळेस कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. पण होलिका दहन झाल्यावर अर्थात वाईटावर चांगल्याने विजय मिळवल्याचा आनंद साजरा केला जातो. तथापि, ही वेळ भगवान विष्णूची पूजा करण्याची खास वेळ आहे

होळीचा शुभ मुहूर्त

💠 होलिका दहनचा दिवस : 28 मार्च 2021

💠 रंगपंचमी दिवस : 29 मार्च 2021

💠 होलिका दहनचा शुभ मुहूर्त : संध्याकाळी 6:37 वाजल्यापासून ते रात्री 8:56 वाजेपर्यंत

💠 पौर्णिमेची तिथी प्रारंभ : 28 मार्च सकाळी 3:27 वाजता

💠 पौर्णिमेची तिथी समाप्ती : 29 मार्च 12:17 वाजता.

बंधुत्वाचा सण होळी

होळीचा सण म्हणजे बंधुत्वाचा सण आहे. लोक आपापसातल्या तक्रारी विसरून हा उत्सव एकमेकांसोबत साजरा करतात आणि एकमेकांना मिठी मारून अभिवादन करतात. यावेळी, रंगांची होळी अर्थात रंगपंचमी खेळली जाते. यंदाही लोक या उत्सवाबद्दल खूप उत्साही आहेत. या उत्सवाची तयारी बरेच दिवस अगोदरच सुरू होते. काही ठिकाणी याची सुरुवात बसंत पंचमीच्या दिवसापासून होते. या दिवशी ढोल-ताशांच्या पूजेनंतर ज्या ठिकाणी होलिका दहन होईल तेथे लाकूड ठेवले जाते. (Holi Shubh Muhurat Holika Dahan Importance)

संबंधित बातम्या :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI