मुंबई शहर, उपनगर, ठाण्यासह कोकण‍ात पुढील काही तास मुसळधार पाऊस

| Updated on: Sep 04, 2019 | 5:07 PM

हवामान ‍विभागाकडून (IMD) पुढील 24 तासात मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह नाशिक, सातारा, कोल्हापूर घाटपरिसरात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. मुंबईत कुलाबा वेधशाळा येथे सकाळी 8:30 पर्यंत 122.00 मी.मी. सांताक्रुझ वेधशाळा येथे 118.3 मी.मी. इतका पाऊस झाला आहे.

मुंबई शहर, उपनगर, ठाण्यासह कोकण‍ात पुढील काही तास मुसळधार पाऊस
Follow us on

मुंबई : हवामान ‍विभागाकडून (IMD) पुढील 24 तासात मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह नाशिक, सातारा, कोल्हापूर घाटपरिसरात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. मुंबईत कुलाबा वेधशाळा येथे सकाळी 8:30 पर्यंत 122.00 मी.मी. सांताक्रुझ वेधशाळा येथे 118.3 मी.मी. इतका पाऊस झाला आहे. सकाळी 8:30 ते 11:30 पर्यंत कुलाबा वेधशाळा येथे 30.00 मी.मी. सांताक्रुझ वेधशाळा येथे 121.4 मी.मी. इतका पाऊस झाला. मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्षाने याबाबत माहित दिली.

पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुंबई, ठाणे, कोकण विभागातील शाळांना आज (4 सप्टेंबर) सुट्टी जाहिर केली. राज्यातील इतर जिल्ह्यांना स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी यांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला.

पश्चिम रेल्वे (Western Railway)

वसई ते विरार रुळावर पाणी साचल्यामुळे त्या दरम्यानची लोकलसेवा बंद झाली आहे. माहिम ते माटुंगा दरम्यान पाणी साचल्यामुळे चर्चगेट ते अंधेरी दरम्यान रेल्वे वाहतूक बंद आहे.

मध्य रेल्वे (Central Railway)

सायन ते कुर्ला, विक्रोळी ते भांडुप येथे रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे सीएसएमटी ते ठाणे लोकलसेवा बंद केली आहे.

हार्बर रेल्वे (harbour Railway)

चुनाभट्टी येथे रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे सीएसएमटी ते वाशी लोकलसेवा बंद केली आहे.

वसई–नालासोपारा विरार येथे पाणी साचल्यामुळे वसई विरार रेल्वे वाहतूक बंद आहे. अंधेरी ते वसई दरम्यान रेल्वे वाहतूक सुरू आहे. दादरमध्ये ‍टिळक पूल, हिंदमाता जक्शन, कुर्लात श्रध्दा जंक्शन, माला गार्डन, बंटर भवन, लायब्रेरी जंक्शन झोन आठ बीकेसी, सायनमध्ये षण्मुखानंद हॉल, एस. आय. ई. एस कॉलेज, अंधेरीत एस.व्ही. रोड, अंधेरी सबवे, वडाळा सर्कल पंचायत या ठिकाणी पाणी साचलं आहे.

रायगड (Raigad)

ताम्हणी घाट, माणगावजवळ रस्त्यावर माती आली असल्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. माती काढण्याचे काम सुरू असून त्यानंतर सदर वाहतूक सुरू करण्यात येईल. रायगडमधील कुंडलीका आणि अंबानदीने धोक्याची पातळी गाठली आहे. या नदीजवळील रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

गडचिरोलीमध्ये (Gadchiroli) भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. भामरागड शहर येथे बाजारपेठेमध्ये पाणी शिरले आहे.

पुणे (Pune)

धरण क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खडकवासला येथून 24 हजार क्यूसेक आणि पवना धरणातून 9500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. सध्या शहरात पाऊस थांबला असून परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली.