वर्ल्डकप भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या वेळी लोकांनी कोणते जेवण मागवले…प्रथमच माहिती आली बाहेर

| Updated on: Dec 15, 2023 | 1:51 PM

Swiggy Annual Report: हैदराबादमधील प्रसिद्ध डिश बिर्याणी देशभरात खवय्यांसाठी सर्वाधिक मागणी असणारी आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात बिर्याणीची क्रेझ वर्षभरात सर्वाधिक होती. चंदीगडमधील एका परिवाराने 70 प्लेट बिर्याणी मागवल्या होत्या.

वर्ल्डकप भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या वेळी लोकांनी कोणते जेवण मागवले...प्रथमच माहिती आली बाहेर
Follow us on

मुंबई, 15 डिसेंबर | वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान सामना हा सर्वाधिक चर्चेचा सामना असतो. यंदाही हा सामना चर्चेत राहिला. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 ऑक्टोबर रोजी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगला. या सामन्यासाठी सर्व तिकीटे पहिल्याच दिवशी विकली गेली होती. त्यामुळे अनेक क्रिकेट प्रेमींना घरी बसून सामन्याचा आनंद घ्यावा लागला. भारत पाकिस्तान क्रिकेट सामना सुरु असताना घरी बसून कोणत्या खाद्यपदार्थाचा लाभ क्रिकेट रसिकांनी घेतला, ही माहिती आली आहे. स्विगीच्या रिपोर्टमधून मिळालेल्या माहितीनुसार ऑनलाईन बुकींगमध्ये त्यावेळी बिर्याणी क्रेज सर्वाधिक होती. चंदीगडमधील एका परिवाराने 70 प्लेट बिर्याणी मागवल्या होत्या. हाय व्होल्टेज असणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात बिर्याणीची क्रेझ वर्षभरात सर्वाधिक होती. यामुळे बिर्याणी खात क्रिकेट सामन्याचा आनंद अनेक जणांनी घेतला.

दुर्गा उत्सवात कशाला होती जास्त मागणी

दुर्गा उत्सवात घराघरात पूजा केली जाते. दुर्गा पूजा सुरु असताना नऊ दिवसांत मिठाई असणाऱ्या गुलाब जामूनला सर्वाधिक मागणी होती. याकाळात देशभरातील लोकांनी 77 लाखांपेक्षा जास्त गुलाब जामून मागवली. तसेच दुर्गा उत्सावाच्या नऊ दिवसांत मसाले डोसाला सर्वाधिक मागणी होती. स्विगीकडून प्रत्येक वर्षाच्या अखेरीस ही माहिती दिली जाते. त्यातून या सर्व बाबी समोर आल्या आहेत. चॉकलेट केकसाठी 85 लाख ऑर्डर बंगळूरमधून देण्यात आल्या. म्हणजेच केक कॅपीटल म्हणून बंगळूर पुढे आले आहे. वर्षभरात प्रत्येक मिनिटाला 271 केकची ऑर्डर दिली गेली आहे.

हे सुद्धा वाचा

एका व्यक्तीने घेतली सहा लाखांची इडली

वर्षभरात इडलीला चांगली मागणी होती. हैदराबादमधील एका व्यक्तीने सहा लाखांची इडली मागवली. १० हजारांहून अधिकच्या ऑर्डर देणाऱ्या शहरात चेन्नई, दिल्ली आणि हैदराबादचा समावेश आहे. लोकांनी केक, गुलाब जामून, पिझ्झा या पदार्थांना चांगली मागणी दिली. हैदराबादमधून सर्वाधिक बिर्याणी मागवण्यात आल्या. 40,30,827 लोकांनी बिर्याणी सर्च केली. देशभरात डिलेव्हरी झालेल्या बिर्याणीत सहा डिलेव्हरी हैदराबादमधून होती.