
राज्यासह देशातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच मोठ्या चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला. काही दिवसांपूर्वी गारठा जाणवत होता. मात्र, चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा देशात पावसाचा इशारा जारी करण्यात आला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा देशातील वातावरणात बदल होईल. अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ सध्या श्रीलंकेच्या किनाऱ्यावर आणि लगतच्या बंगालच्या उपसागरावर आहे. पुढील 24 ते 48 तासांत ते भारतात धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक भागांमध्ये मोठा इशारा जारी करण्यात आला. तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये या वादळाचा फटका बसल्याची शक्यता आहे.
29 ते 30 नोव्हेंबरदरम्यान तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे. 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आंध्र प्रदेश आणि रायलसीमाच्या किनारी भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. यादरम्यान जोरात वारे देखील वाहिल. कोकण किनारपट्टीवर देखील पावसाचा अंदाज आहे. नोव्हेंबर महिन्यात कधी पाऊस तर कधी गारठा बघायला मिळत आहे. सकाळी गारठा जाणवत आहे.
देशाच्या काही भागात जरी पावसाचा इशारा देण्यात आला असला तरीही राज्यात हुडहुडी बघायला मिळेल. राज्यात 2 ते 3 डिसेंबरपर्यंत थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. मागील दोन चार दिवसांपासून मुंबई पुन्हा थंडी जाणवत आहे. 28 नोव्हेंबर 2025 रोजी भंडाऱ्यात राज्यातील निचांकी तापमानाची नोंद झाली. भंडाऱ्यात 10 अंश तापमान होते. हिटवाह चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील काही भागात बघायला मिळेल. राज्यात ढगाळ वातावरण असेल. विदर्भातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे.
The #Cyclonic_Storm #Ditwah [Pronunciation: Ditwah] over coastal Sri Lanka and adjoining southwest Bay of #Bengal moved slowly north-northwestwards with the speed of 4 kmph during past 6 hours and lay centered at 1130 hrs IST of today, the 28th November 2025 over the same region,… pic.twitter.com/5dARTeKDiO
— India Meteorological Department (@Indiametdept) November 28, 2025
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, श्रीलंकेच्या किनारपट्टी आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरावर तयार झालेले गेल्या सहा तासांत 4 किमी प्रतितास वेगाने उत्तर वायव्येकडे सरकत आहे. आज 28 नोव्हेंबर दुपारी हे वादळ श्रीलंकेतील त्रिंकोमालीपासून सुमारे 30 किमी नैऋत्येस, 8.4° उत्तर रेखांश आणि 81.०° पूर्व अक्षांशावर होते. दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार होईल. दरम्यान, उत्तर भारतासह देशाच्या अनेक भागात तीव्र थंडी पडत आहे.