Indian Railways: प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या; आता रेल्वेत मोबाईल, लॅपटॉप चार्जिंग विसरा!

| Updated on: Mar 30, 2021 | 7:57 PM

शताब्दी एक्सप्रेसमध्ये आग लागल्यानंतर रेल्वे प्रशासनाने आता कठोर निर्णय घेतले आहेत. (Indian Railways stop providing facility to charge cell phones, laptops)

Indian Railways: प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या; आता रेल्वेत मोबाईल, लॅपटॉप चार्जिंग विसरा!
Railways charging point
Follow us on

मुंबई: शताब्दी एक्सप्रेसमध्ये आग लागल्यानंतर रेल्वे प्रशासनाने आता कठोर निर्णय घेतले आहेत. त्यानुसार आता प्रवाशांना रात्रीच्यावेळी प्रवास करताना एक्सप्रेसमध्ये मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग करता येणार नाही. आगीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. (Indian Railways stop providing facility to charge cell phones, laptops)

रेल्वेने रात्रीच्यावेळी मोबाईल चार्जिंग पॉइंट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी याबाबतची ही माहिती दिली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने एक्सप्रेसमधील चार्जिंग पॉइंट रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असं ठाकूर यांनी सांगितलं. याबाबतचं वृत्त मुंबई मिरर या दैनिकाने दिलं आहे.

आगीच्या घटना रोखण्यासाठी निर्णय

लांबपल्ल्यांच्या गाड्यामध्ये रात्रभर मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग केले जातात. त्यामुळे होणारी ओव्हर चार्जिंग आणि हिटींगमुळे आग लागण्याच्या घटना घडतात. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणूनच रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. रेल्वे दिलेल्या या आदेशाचं आम्ही पालन करत आहोत. याबाबत रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांना जागरूक करण्याचं काम आम्ही करत आहोत, असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितलं.

अधिकारी करणार चेकींग

मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंगमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. याबाबत आम्हाला दिवसातून किमान तीन तरी तक्रारी ऐकायला मिळतात, असं तिकीट चेकिंग स्टाफचं म्हणणं आहे. तर रेल्वेने एसी मॅकेनिकसह सर्व कर्मचाऱ्यांना रात्री चार्जिंग पॉइंट बंद ठेवण्यास सांगण्यात आल्याचं एका रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितलं. तसेच अधिकाऱ्यांना स्वत: सरप्राईज भेट देऊन चार्जिंग पॉइंट बंद आहेत की नाही हे पाहण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही या अधिकाऱ्याने सांगितलं. तर काही अधिकाऱ्यांनी रेल्वेत स्मोकिंगला बंदी घालण्याची गरजही व्यक्त केली आहे. स्मोकिंगमुळे आगीची घटना घडल्यास त्यामुळे सार्वजनिक संपत्तीचं नुकसानच होतं, असं या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

संघटनांचा विरोध

दरम्यान, रेल्वेच्या या नव्या आदेशाला रेल्वे संघटनांनी विरोध केला आहे. चार्जिंग पॉइंट बंद करण्याचा निर्णय योग्य नाही. प्रवाशांच्या सुविधा वाढवण्याऐवजी त्या कमी केल्या जात आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी पुन्हा विचार केला पाहिजे, असं मत वेस्टर्न रेल्वे झोनल यूजर्स कन्स्लटेटीव्ह कमिटीचे सदस्य शैलेश गोयल यांनी सांगितलं. तर, रेल्वेने रात्री चार्जिंग पॉईंट बंद करण्याचा निर्णय का घेतला हे कळत नाही. लॅपटॉप आणि मोबाईल आता आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे, असं पॅसेंजर राईट अॅक्टिव्हिस्ट सुभाष गुप्ता यांनी सांगितलं. (Indian Railways stop providing facility to charge cell phones, laptops)

 

संबंधित बातम्या:

कोरोनाचा कहर थांबेना, आता या राज्यात 8 वी पर्यंत शाळांना टाळं

Indian Railway: रेल्वेने प्रवास करताय तर गाईडलाईन्स नक्की वाचा, अन्यथा बसेल मोठा फटका

‘मिशन लसीकरण’; राज्यात कोरोना लसीकरणाच्या कामाला वेग; चांद्यापासून बांद्यापर्यंत जय्यत तयारी!

रात्री 8 वाजता यायचं, काहीही बोलायचं आणि निघून जायचं, असं काम आम्ही करत नाही : अस्लम शेख

(Indian Railways stop providing facility to charge cell phones, laptops)