रात्री 8 वाजता यायचं, काहीही बोलायचं आणि निघून जायचं, असं काम आम्ही करत नाही : अस्लम शेख

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कोरोना नियंत्रणासाठी महाराष्ट्र सरकारकडून सुरु असलेल्या कामाची माहिती देतानाच मोदी सरकार आणि भाजपला जोरदार टोले लगावले आहेत.

रात्री 8 वाजता यायचं, काहीही बोलायचं आणि निघून जायचं, असं काम आम्ही करत नाही : अस्लम शेख

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कोरोना नियंत्रणासाठी महाराष्ट्र सरकारकडून सुरु असलेल्या कामाची माहिती देतानाच मोदी सरकार आणि भाजपला जोरदार टोले लगावले आहेत. “रात्री 8 वाजता यायचं, काही बोलायचं आणि निघून जायचं, असं काम आम्ही करत नाही. आम्ही प्रत्येक गोष्टींमध्ये विचार करतो आणि मग कृती करतो,” असं मत अस्लम शेख यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी मुंबईतील कोरोना नियंत्रण आणि लोकल सुरु करण्याबाबतची सरकारची भूमिकाही स्पष्ट केलं (Minister Aslam Shaikh criticize Modi Government and BJP over politics in Corona prevention work).

अस्लम शेख म्हणाले, “पालिका आयुक्तांनी फक्त पब आणि बारबद्दल उदाहरण दिलं आहे. या ठिकाणी लोक गर्दी करत आहेत. बाहेर पडू लागल्याने नाईट कर्फ्यू लागला पाहिजे, असा त्यांचा विचार होता. परंतु सरकार या मताशी सहमत नाही. जर गरज वाटली तर आम्ही कारवाई करू शकतो. नाईट कर्फ्यू आणू शकतो, परंतु सध्या असं काही वाटत नाहीये. सध्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे. त्याला कोणताही राजकीय रंग देणे योग्य वाटत नाही.”

“विरोधकांना कोणाशी काही देणं घेणं नाही. पहिल्या दिवसापासून त्यांचं म्हणणं होतं की धार्मिक स्थळं उघडा, ट्रेन चालू करा, बस चालू करा, एसटी चालू करा, लोकांना एकत्र येऊ द्या. मात्र, असं चालत नाही. सरकार एका मतावर ठाम होती. टास्क फोर्सने जे काही सल्ले दिले त्या पद्धतीने आम्ही वागत गेलो. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात रुग्ण कमी आहेत. जगाच्या पातळीवर महाराष्ट्राचं नाव चांगलं काम केलं म्हणूनच आलं आहे. तरीही लोक बाहेर पडत असतील तर त्यासाठी आयुक्तांनी लोकांना आवाहन केलं आहे,” असं अस्लम शेख म्हणाले.

“रात्री 8 वाजता यायचं, काहीही बोलायचं आणि निघून जायचं, असं काम आम्ही करत नाही”

अस्लम शेख यांनी यावेळी मोदी सरकारच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीवर खोचक टोला लगावला. “लोकल ट्रेनसाठी देखील टास्क फोर्स आहे. त्यावर आम्ही विचार करत आहोत. रात्री 8 वाजता यायचं, काही बोलायचं आणि निघून जायचं, असं काम आम्ही करत नाही. आम्ही प्रत्येक गोष्टींमध्ये विचार करतो आणि मग कृती करतो. टास्क फोर्स मला ज्या पद्धतीने अभ्यास केल्यानंतर सल्ला देत आहे त्यानुसार लवकरात लवकर आम्ही ट्रेन देखील आम्ही चालू करू,” असंही अस्लम शेख यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

उत्तर प्रदेश आधी भयमुक्त करा, मग बॉलिवूडचं स्वप्न बघा, अस्लम शेख यांचा योगींवर हल्ला

भाजपच्या काळात CBI ची पानटपरी झाली, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील मंत्र्याचा हल्लाबोल

महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यपालांनी पुस्तक छापणे ही पहिलीच घटना: मंत्री अस्लम शेख

Minister Aslam Shaikh criticize Modi Government and BJP over politics in Corona prevention work

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI