AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शॉपिंग मार्ट आहे की 5 स्टार हॉटेल, ₹ 4 लाखाला दारुची बाटली… सेलिब्रिटी खरेदी करत असलेल्या मार्टचा व्हिडीओ समोर

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या घरात लागणाऱ्या गोष्टी कुठून खरेदी करतात हे दाखवण्यात आले आहे. तसेच टोमॅटो पासून ते वाईनच्या बाटलीपर्यंत सर्वांच्या किंमती दाखवण्यात आल्या आहेत. त्या किंमती ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.

शॉपिंग मार्ट आहे की 5 स्टार हॉटेल, ₹ 4 लाखाला दारुची बाटली... सेलिब्रिटी खरेदी करत असलेल्या मार्टचा व्हिडीओ समोर
Shopping MartImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 04, 2026 | 3:11 PM
Share

बॉलिवूड कलाकार हे कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या आगामी सिनेमांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. कलाकारांचे लग्झरी आयुष्य हा देखील चर्चेचा विषय असतो. कलाकार कुठे राहतात, ते कोणते खाद्यपदार्थ खातात? ते खरेदी कुठून करतात? अशा अनेक गोष्टी चाहत्यांना जाणून घ्यायच्या असतात. सध्या सोशल मीडियावर एक यासंबंधीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कलाकार हे कुठून खरेदी करतात? हे दाखवण्यात आले आहे.

सोशल मीडियावर एका रिल स्टारने मुंबईतील सेलिब्रिटी मॉलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रिल स्टार सुरुवातीलाच बोलताना दिसत आहे की हे शॉपिंग मार्ट आहे की एखादे 5 स्टार हॉटेल. यावरुन ते मार्ट आतून कसे आहे याचा अंदाज लावला आहे. तसेच हा रिलस्टार या मार्टमध्ये सर्वात स्वस्त काय मिळते? हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Harsh Puri (@_har.sshh_)

जपानवरुन आलेला कलिंगड

व्हिडीओमध्ये रिलस्टार सुरुवातील एका मक्याची किंमत सांगतो. साऊथ अमेरिकेहून आलेला मका 1000 रुपये किलो. त्यानंतर पेरू येथून आलेला जांभळ्या रंगाचा मका दाखवला आहे. या मक्याची किंमत 1000 रुपये पावकिलो, जपान वरुन आलेला पिवळ्या रंगाचा कलिंगड दाखवला आहे. त्याची किंमत 500 रुपये आहे. या मार्टमध्ये अनेक देशातून आलेले सॉफ्ट ड्रिंक्स देखील आहेत. या ड्रिंक्सची किंमत देखील जास्त असल्याचे रिल स्टारने म्हटले आहे. जपान वरुन आलेले मेन्टॉस देखील या मार्ट आहे. याची किंमत 150 रुपये आहे.

चॉकलेटची किंमत ऐकून बसेल धक्का

खाण्याच्या एका चिप्सची किंमत 850 रुपये, एका छोट्या आयस्क्रीम कपची किंमत 950 रुपये असल्याचे दाखवले आहे. त्यानंतर रिल स्टार वाइन विक्रीसाठी असलेल्या भागामध्ये जातो. तेथे त्याला सर्वात महाग वाईन ही 4 लाख 5 हजार रुपये असल्याचे दाखवले आहे. रिल स्टार बोलताना दिसत आहे की ही वाईन एखाद्या खजिन्यासारखी ठेवली आहे. त्यानंतर रिल स्टार हा चॉकलेट सेक्शनमध्ये गेला आहे. त्याने तेथे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट पाहिलेत आहेत. तेथील सर्वात महागडे चॉकलेट हे 700 रुपयांचे असल्याचे दाखवले आहे.

टोमॅटो 1500 रुपये किलो

रिल स्टारमध्ये या मार्टमधील भाज्या देखील दाखवल्या आहेत. स्पेनवरुन येथे टोमॅटो येताता. या टोमॅटोची किंमत 1500 रुपये आहे. चीनवरुन आलेला मटार 500 रुपये किलो, वेगवेगळ्या रंगाचा फ्लॉवरची किंमत 750 रुपये किलो लिहिली आहे. शेवटी बजेटमध्ये काहीच न मिळाल्यामुळे रिल स्टार हा एक कागदाची पिशवी जी 29 रुपयांना आहे ती घेऊन बाहेर पडतो.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी