मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करणार ‘पाताळ लोक’, जमीनीखालून मार्गाचे जाळे उभारणार

मुंबई पूर्व-पश्चिम जोडणीसाठी एकात्मिक बोगदा प्रणाली (पाताल लोक) आणि उत्तन ते विरार या मार्गाचा सुधारित आराखडा सादर करण्यात आला आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करणार पाताळ लोक, जमीनीखालून मार्गाचे जाळे उभारणार
Integrated Tunnel System for East-West Connectivity
| Updated on: Nov 19, 2026 | 7:53 PM

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवासातील कोंडी दूर करुन तो वेगवान करण्यासाठी जमिनीखालून रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. यासाठी वांद्रे-वरळी सागरी सेतू, वांद्रे-कुर्ला संकुल ( बीकेसी ), मुंबई विमानतळ आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना जोडणाऱ्या सुमारे ३१ किलोमीटर लांबीच्या एकात्मिक रस्ता बोगदा प्रणालीचा ( पाताळ लोक ) आराखडा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ( एमएमआरडीए ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गुरुवारी सादर करण्यात आला आहे.

याच सोबत मुंबई-वाढवण द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या भाईंदर-उत्तन ते विरार या सागरी मार्गाचे सुधारित आरेखनही मांडण्यात सादर करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील पूर्व-पश्चिम जोडणी अधिक सक्षम होण्यासह प्रस्तावित रिंगरोडचे जाळेही विस्तारण्यास मदत होणार आहे.

Loading...

मुंबई शहराच्या पूर्व-पश्चिम जोडणीसाठी एकात्मिक बोगदा प्रणाली (पाताल लोक) आणि उत्तन ते विरार या मार्गाचा सुधारित आराखडा सादर करण्यात आला आहे. एमएमआरडीएच्या या दोन पायाभूत प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले आहे.

एमएमआरडीएच्यावतीने सादर करण्यात आलेल्या एकात्मिक रस्ता बोगदा प्रणालीचा एका दिशेचा मार्ग सुमारे ३१ किलोमीटरचा असून या प्रकल्पामुळे वांद्रे-वरळी सागरी सेतू, बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानक, धारावी, वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई विमानतळ, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना प्रवेश आणि निर्गमन मार्गांद्वारे जोडण्याचे नियोजन आहे. या मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांसह बीकेसी आणि विमानतळाला थेट जोडणी मिळणार आहे.

मुंबई-वाढवण द्रुतगतीमार्ग जोडणीच्या भाईंदर-उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाला यापूर्वीच मान्यता मिळाली होती. यासंदर्भात या मार्गाच्या आरेखनाच्या दोन पर्यायांवर चर्चा करण्यात आली. या प्रस्तावित मार्गांमुळे मुंबई महानगरप्रदेशातील प्रस्तावित रिंगरोडची जोडणी अधिक सक्षम होणार असून मुंबईतील प्रवास कमीत कमी वेळात होण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us