एकनाथ शिंदे चांगलं काम करतात, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून तोंडभरून कौतुक; भुवया उंचावल्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. तब्बल नऊ तास पवार यांनी या बैठकीत आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध लोकसभा मतदारसंघाची माहितीही घेतली. शरद पवार हे उद्या मीडियाशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते विविध प्रश्नांची उत्तरे देणार आहे. पवार हे अजितदादांच्या टीकेवर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदे चांगलं काम करतात, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून तोंडभरून कौतुक; भुवया उंचावल्या
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 08, 2024 | 10:33 PM

मुंबई | 8 जानेवारी 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार हे कल्याणमध्ये आले असता त्यांनी ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर बोट ठेवलं. अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच टोला लगावला होता. महायुतीत असूनही अजितदादांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलं काम करत असल्याची पोचपावतीच जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली. ठाण्यात गुंडगिरी आहे म्हणता मग पुण्यात काय आरत्या होतात काय? पुण्यात जितकी गुंडगिरी होते, तितकी मुंबईतही नाही. तुम्ही स्वत:च्या खाली काय जळतय ते पाहा, असं सांगतानाच आमच्याकडे कुठलीही गुंडगिरी वाढलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलं काम करतात. तुम्ही आमच्या जिल्ह्यातील नेत्यांना बोलणार तर आम्हीही बोलू, असा इशाराच जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

त्यांना शिंदे नकोत

अजित पवारांनी कल्याण आणि मुंबईत भाषण केलेलं आहे. ठाण्यात खूप गुंडागर्दी असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत म्हणून हे वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला नकोत हे आम्हाला माहिती आहे. अजित पवार यांना सांभाळून चालणं स्वभावात नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

ऊंची पाहून बोला

यावेळी त्यांनी अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावरही टीका केली. मिटकरींची प्रचंड वादग्रस्त विधान आहेत. ती काढली तर त्यांना राज्यात फिरणं अवघड होईल. अजित पवारांनी 50 हजाराच्या पगारांवर ठेवलेल्या माणसांनी स्वत:ची उंची ठरवून बोलावं. अमोल मिटकरी 8-10 हजार घेवून व्याख्यानं करत फिरायचे, असा हल्लाच त्यांनी चढवला.

नऊ तास मिटिंग

लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला. शरद पवारांनी तब्बल नऊ तास विविध भागातील आढावा घेतला. लोकसभेच्या निवडणुकीत जांगावर चर्चा करण्यात आली. निवडणुक कोणतीही असो शरद पवार ती गांभीर्यानं घेतात. शरद पवार उद्या सकाळी 12 वाजता माध्यमांशी बोलतील, असं त्यांनी सांगितलं.