कल्याण-डोंबिवली दरम्यान लोकल वाहतूक 4 तास बंद, 124 फेऱ्या रद्द

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने कल्याण ते कर्जत-कसारा, सीएसएमटी ते डोंबिवली, ठाणे-डोंबिवली दरम्यान 20 मिनिटाच्या अंतराने विशेष लोकल सेवा सुरु ठेवली आहे.

कल्याण-डोंबिवली दरम्यान लोकल वाहतूक 4 तास बंद, 124 फेऱ्या रद्द
| Edited By: | Updated on: Dec 25, 2019 | 10:24 AM

कल्याण : नाताळच्या सुट्टीच्या निमित्ताने मध्य रेल्वेने बुधवारी (आज) ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचं काम हाती घेत मेगाब्लॉक (Kalyan Dombivali Mega block) जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकमुळे कल्याण ते डोंबिवली दरम्यानची रेल्वे वाहतूक सकाळी 10 ते दुपारी 2 वाजताच्या दरम्यान बंद राहणार आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने कल्याण ते कर्जत-कसारा, सीएसएमटी ते डोंबिवली, ठाणे-डोंबिवली दरम्यान 20 मिनिटाच्या अंतराने विशेष लोकल सेवा सुरु ठेवली आहे. मेगाब्लॉकमुळे 124 लोकल, 16 लांब पल्ल्याच्या गाड्या या चार तासांच्या अवधीत रद्द करण्यात आल्या आहेत.

नाताळची सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे नोकरदार आणि विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार नाही. परंतु नाताळनिमित्त मुंबई, ठाण्यात फिरायला जाणाऱ्यांसाठी हा मेगाब्लॉक तापदायक ठरु शकतो.

मुंबई-पुणे महामार्गावर शालेय बसचा अपघात, 15 विद्यार्थी, 3 शिक्षक गंभीर जखमी

ठाकुर्ली रेल्वे स्थानकात पादचारी पूल बांधून तयार झाला आहे. या पुलावर सहा मीटर लांबीचे चार गर्डर शक्तिशाली क्रेनच्या साहाय्याने ठेवण्यात येणार आहेत. हे काम सकाळी पावणेदहा ते दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम विनाअडथळा पूर्ण करता यावे, यासाठी कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यानची लोकल सेवा सकाळी 9.15 ते दुपारी 1.45 या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मेगाब्लॉकच्या काळात 87 विशेष लोकल कल्याण ते कर्जत-कसारा आणि सीएसएमटी ते डोंबिवली दरम्यान सोडण्यात येणार आहेत. लांब पल्ल्याच्या काही गाड्या दिवा-पनवेल-कर्जत मार्गे वळवण्यात येणार आहेत. याशिवाय, रेल्वेने केडीएमटी प्रशासनाला विशेष बस सोडण्याची मागणी केली आहे. ठाणे-सीएसएमटी लोकल सेवा त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरु राहणार (Kalyan Dombivali Mega block) आहे.