मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच किरीट सोमय्या शिवसेनेला घेरणार?; आता स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव रडारवर

| Updated on: Dec 04, 2021 | 10:47 AM

पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या मोठा बॉम्ब टाकण्याची चिन्हे दिसत आहेत. सोमय्या यांनी आता थेट शिवसेनेचे महापालिकेती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनाच घेरण्याचे संकेत दिले आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच किरीट सोमय्या शिवसेनेला घेरणार?; आता स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव रडारवर
kirit somaiya
Follow us on

मुंबई: पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या मोठा बॉम्ब टाकण्याची चिन्हे दिसत आहेत. सोमय्या यांनी आता थेट शिवसेनेचे महापालिकेती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनाच घेरण्याचे संकेत दिले आहेत. यशवंत जाधव यांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचं सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे जाधव यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

किरीट सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केली आहे. आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. यशवंत जाधव यांची अवस्था चोर मचाये शोर अशी झाली आहे. मात्र, काहीही असले तरी यशवंत जाधव यांच्या चौकशीला गती देण्यासाठी पाठपूरावा करणार आहे, असं सोमय्या म्हणाले.

चार नेत्यांचा घोटाळा उघड करणार

दरम्यान, मराठवाड्यातील चार नेत्यांचा घोटाळा उघड करणार असल्याचंही सोमय्या यांनी जाहीर केलं. मराठवाड्यातील चार नेत्यांनी 20 कोटी रुपये बिटकॉईनमध्ये गुंतवले आहेत. ठाकरे सरकारच्या या नेत्यांचा घोटाळा उघड करण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं. बिटकॉईनच्या ट्रान्झॅक्शनची डिटेल माझ्याकडे आली आहे. मी सोमवारी ईडी कार्यालयात जाणार आहे. या घोटाळ्याची ईडी चेअरमन आणि केंद्रीय अर्थ खात्याला त्याची माहिती देणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आरोप असलेल्या नेत्यांना निलंबित करा

बिटकॉईनमध्ये मोठी गुंतवणूक करणारे हे तीन ते चार नेते आहेत. त्यांचे एजंट समोर आले आहेत. अशोक चव्हाणांचे जे मित्रं आहेत, त्यातून खूप काही बाहेर येणार आहे. पाहुयात काय होतंय ते, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील अनेक नेते आणि अधिकारी भ्रष्टाचारात आहेत. परमबीर सिंग यांना निलंबित केलं तसं या आरोप असलेल्या नेत्यांनाही निलंबित करा, अशी मागणीही त्यांनी केली.

काही जेलमध्ये तर काही बेलवर

अनिल देशमुखप्रकरणाचा पाठपुरावा केला. भावना गवळींच्या आईंवर कारवाई होणार आहे. अशोक चव्हाण, अर्जून खोतकर, प्रताप सरनाईक यांची 78 एकर जागा जप्त करण्यात आली आहे. काही जेलमध्ये आहेत, तर काही बेलवर आहेत. शिवाय काही काही रुग्णालयात असणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

सरकार ऐकलंत का? राज्याच्या मुख्य सचिवांनी कोरोना लसीचा पहिला डोस डिसेंबरमध्ये घेतला? चक्रवर्ती म्हणतात, पर्सनल चॉईस

अवकाळी पावसात 2 हजार जनावरे दगावली, राज्य सरकारकडून पशूपालकांना मिळणार आर्थिक मदत

माऊलींच्या जन्मभूमीत विज्ञानाचा साक्षात्कार! ढगांचा पडदा उघडला, सूर्य डोकावला, किरणोत्सव पाहून खगोलशास्त्रज्ञांनाही अश्रू अनावर!