
Ladki Bahin Yojana ekyc: लाडकी बहीण योजनेच्या कोट्यवधी लाभार्थी महिलांना मोठी आनंदवार्ता मिळाली आहे. ई-केवायसीची अंतिम मुदत यापूर्वी 18 नोव्हेंबर ही होती. ती आता 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही तारीख जवळ येत आहे. तर काही महिलांनी अद्याप ईकेवायसी केलेली नाही. आता त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ई-सेवा केंद्रावर ताटकळत उभं राहण्याची गरज नाही. त्यांना अवघ्या काही मिनिटांमध्ये ही प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करता येईल. याविषयीची अपडेट जाणून घ्या.
सरकारने वाढवली ई-केवायसीची अंतिम मुदत
राज्य सरकारने आता लाडकी बहीण योजनेची E-kyc ची तारीख पुढे ढकलली आहे. ही तारीख आता 31 डिसेंबर 2025 ही आहे. म्हणजे लाभार्थी महिलांना अजून एक महिना हातात आहे. पात्र लाभार्थ्यांना आता घरबसल्या ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. याविषयीची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. महिलांच्या अडचणी लक्षात घेत ही तारीख वाढवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घरबसल्या करा ई-केवायसीची प्रक्रिया
ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जा
होम पेजवरील ईकेवायसी बॅनरवर क्लिक करा. ई-केवायसी फॉर्म उघडेल
या फॉर्ममध्ये लाभार्थ्याला त्यांचे आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड द्यावा लागेल
आधार ऑथिंटिकेशनसाठी सहमती द्यावी लागेल. त्यासाठी ओटीपीसाठी क्लिक करा
यानंतर लाभार्थ्याच्या आधाराला जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. हा ओटीपी टाईप करून तो सबमिट करा
जर ईकेवायसी अगोदरच झाले असेल तर तसा मॅसेज येईल
जर ईकेवायसी पूर्ण झाली नसेल तर तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही ते तपासा
केव्हा सुरू झाली लाडकी बहीण योजना?
राज्य सरकारने जून 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. महिलांना आर्थिक मदत करणे आणि पुढे कर्ज पुरवठ्याद्वारे त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचा उद्देश आहे. या योजनेत पात्र लाभार्थी महिलेला दरमहा 1500 रुपयांचा सन्माननिधी थेट डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात जमा होतो. या योजनेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने या योजनेत ई‑KYC प्रक्रिया बंधनकारक केली आहे.