Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या मंडपाजवळ पुन्हा धक्कादायक घटना; 68 वर्षीय भाविकाचा मृत्यू, काही दिवसांत दुसरी घटना

अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबागच्या राजाच्या मंडपाजवळून दुःखद बातमी समोर आली आहे. 68 वर्षीय स्थानिक रहिवासी विजय आणेकर यांचा गुरुवारी रात्री अचानक बेशुद्ध पडल्यानंतर मृत्यू झाला. ते मंडपाच्या परिसरातील हनुमान मंदिराजवळ बसले असताना...

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या मंडपाजवळ पुन्हा धक्कादायक घटना; 68 वर्षीय भाविकाचा मृत्यू, काही दिवसांत दुसरी घटना
Lalbaugcha Raja Ganesh Festival Sees 2nd Death
Image Credit source: social media
| Updated on: Sep 25, 2026 | 8:19 PM

लाडक्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप देण्यासाठी आज राज्यभरात अनंत चतुर्दशीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, याच मंगलमय वातावरणाला गालबोट लावणारी एक अत्यंत दुःखद बातमी लालबागमधून धडकली आहे. नवसाला पावणारा बाप्पा म्हणून ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या मंडपाबाहेर गुरुवारी रात्री एका ज्येष्ठ नागरिकाने प्राण सोडले. यंदाच्या गणेशोत्सवात लालबाग परिसरात घडलेला हा दुसरा दुर्दैवी मृत्यू ठरल्याने भाविकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे

नेमकं काय घडलं?

काळाचौकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय आणेकर असे या ६८ वर्षीय मृत वृद्धाचे नाव असून ते लालबागचेच स्थानिक रहिवासी आहेत. गुरुवारी रात्रीच्या सुमारास आणेकर हे राजाच्या मंडपालगतच असलेल्या हनुमान मंदिरात विसावले होते. त्याचवेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ते बेशुद्ध होऊन जागीच कोसळले. आजूबाजूच्या नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना परळच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने, तिथे पोहोचताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या या अचानक मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वीच लालबागमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला होता. १७ सप्टेंबर रोजी राजाच्या चरणी लीन होण्यासाठी पुण्यावरून आलेल्या जयदीप मेघराज नेमाडे या २५ वर्षांच्या तरुणाचाही असाच करुण अंत झाला होता. प्रचंड गर्दीच्या रेट्यात दर्शन रांगेत असताना जयदीपची प्रकृती अचानक खालावली आणि रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला.

गर्दीच्या ठिकाणी गांभिर्याने लक्ष देण्याची गरज

पुण्याच्या तरुणाच्या मृत्यूच्या धक्क्यातून नागरिक सावरत नाहीत तोच, आता आणेकर यांच्या निधनाने लालबागमधील गर्दीचे नियोजन आणि वैद्यकीय यंत्रणांच्या सज्जतेवर बोट ठेवले जात आहे. बाप्पाच्या दर्शनाच्या ओढीने राज्यभरातून लाखो भाविक इथे येतात. अशा वेळी ऐन गर्दीच्या ठिकाणी आपत्कालीन आरोग्य सुविधा आणि तातडीची वैद्यकीय मदत पुरवण्यात कुठेतरी प्रशासकीय पातळीवर अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us