AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा समाजाला आरक्षण दिल्यावर वकील गुणरत्न सदावर्ते आक्रमक, ती चूक दाखवत म्हणाले…

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं आहे. विधानसेभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमध्ये या कायद्याला मंजुरी देण्यात आली आहे. आता मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायलयात टिकणार की नाही हे पाहावं लागणार आहे. अशातच यावर गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण दिल्यावर वकील गुणरत्न सदावर्ते आक्रमक, ती चूक दाखवत म्हणाले...
Gunaratna sadavarte controversial statement
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 20, 2024 | 3:25 PM
Share

मुंबई : मराठा आरक्षणासाठी घेण्यात आलेल्या एकदिवसीय अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये एकमताने मंजुर करण्यात आला. आता मराठा समजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये स्वतंत्र 10 टक्के आरक्षण मिळालं आहे. आता हे आरक्षण न्यायालयात टिकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विरोधकांनी हे आंदोलन टिकणार नसून मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केल्याची टीका केली आहे. अशातच यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

कोणत्या आधारावर आर्थिक मागासलेपणाला सामाजिक मागासलेपणामध्ये रूपांतरित करत आहात. सर्वोच न्यायालयाचे अनेक निवाडे आहेत, ज्यामध्ये अशा प्रकारची कृती म्हणजेच मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन त्या निकालामध्ये जी काही गाईडलाईन तत्त्व सांगितली होती. त्या गाईडलाईन्सचा चकनाचुर या बिलाच्या माध्यमातून केला आहे. मुळातच मराठा समाज सामाजिक मागास आहे हे दाखवण्यासाठी जो संदर्भा दिला गेला तोही चुकीचा आहे. हा चुकीचा संदर्भ अशा एका व्यक्तीच्या हातात देण्यात आला. जे निवृत्त न्यायाधीश शुक्रे आहेत ते मराठा आरक्षणवादी कार्यकर्ते असल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मी एका सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याचा मुलगा आहे. मराठा समाजाच्या वेदना, दुःखाची मला जाणीव आहे. राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला. एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आता काळाच्या ओघात मागे पडला आहे. शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्‍याही तो मागे लोटला जातोय. मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवून द्यायच हा निर्धार आम्ही केला होता. हे आरक्षण न्यायालयामध्ये टिकणार असून त्यासाठी एक समिती स्थापन केल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

राज ठाकरेंनी सरकारवर केली टीका

सरकारने 10 टक्के आरक्षण दिलं म्हणजे काय दिलं, तुम्हाला तसे अधिकार कुणी दिले? तुम्हाला या गोष्टीचे अधिकार आहेत का? निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी करायच्या. याला काही अर्थ आहेत का? असं एका राज्यात एका जातीसाठी असं करता येत नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती