महाकुंभातील मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या मोठी, मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले नाही, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

Mahakumbh Stampede: महाकुंभातील चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल सोशल मीडियावर प्रकाश आंबेडकर यांनी लिहिले आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या मोठी आहे. परंतु उत्तर प्रदेश प्रशासनाने ही संख्या खोटी सांगितली आहे.

महाकुंभातील मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या मोठी, मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले नाही, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
महाकुंभात चेंगराचेंगरी किती मृत्यू?
Jitendra Zavar | Updated on: Feb 08, 2025 | 2:20 PM

Mahakumbh Stampede: काही दिवसांपूर्वी महाकुंभात चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या लवण्यात आली आहे. महाकुंभात प्रत्यक्षात १००० पेक्षा जास्त भविकांचा मृत्यू झाला आहे. महाकुंभात आलेल्या काही मृत भाविकांची वाहने अजूनही पार्किंगमध्ये पडून आहेत. योगी आदित्यनाथ आणि त्यांचे प्रशासन ही वाहने लपवायला विसरले असतील, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर ट्विट केले आहे.

मृतदेहांवर अंत्यसंस्कार भट्टीत

महाकुंभातील चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल सोशल मीडियावर प्रकाश आंबेडकर यांनी लिहिले आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या मोठी आहे. परंतु उत्तर प्रदेश प्रशासनाने ही संख्या खोटी सांगितली आहे. योगी आदित्यनाथ यांनी केलेले हे सर्वात मोठे कव्हर-अप आहे. मृत भाविकांची संख्या लपविण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी भाविकांचा मृतदेह हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार न करता भट्टीत दहन केले आहे.

  • ॲड. आंबेडकरांनी या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काही प्रश्न विचारलेले आहे.
  • चेंगराचेंगरीत हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला योगी आदित्यनाथ जबाबदार आहात की पंतप्रधान नरेंद्र मोदी?
  • योगी आदित्यनाथ मृत भाविकांच्या कुटुंबियांना तुम्ही काय उत्तर द्याल? कोणीतरी तिचा नवरा गमावला आहे, कोणीतरी तिचा भाऊ गमावला आहे तर कोणीतरी तिचा बाप गमावला आहे! तुम्ही त्यांना काय उत्तर द्याल?
  • योगी आदित्यनाथ, हिंदू विधी न पाळता त्यांच्या हिंदू भक्तांचे मृतदेह भट्टीत का जाळले? एखाद्याच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करणे किती महत्त्वाचे आहे, हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. योगी आदित्यनाथ यांनी खोटे बोलून आणि हिंदू विधी न पाळता त्यांचे मृतदेह भट्टीत जाळून १००० हून अधिक हिंदू भाविकांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना फसवले नाही का?
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us