AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Jihad: लव्ह जिहाद कायद्याचा पहिला डॉफ्ट; राज्य सरकारचे मोठे पाऊल, घडामोड काय?

Love Jihad and anti illegal conversion law: पुण्यातील भिगवण येथील कथित अपहरण राज्यात गाजत असताना राज्य सरकारने लव्ह जिहाद कायद्याविषयी मोठे पाऊल टाकले आहे. कायद्याचा पहिला ड्राफ्ट, मसुदा तयार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. काय आहे ती मोठी अपडेट?

Love Jihad: लव्ह जिहाद कायद्याचा पहिला डॉफ्ट; राज्य सरकारचे मोठे पाऊल, घडामोड काय?
लव्ह जिहाद कायद्याचा मसुदाImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 26, 2026 | 10:21 AM
Share

Love Jihad and anti illegal conversion law: पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील तरुणीचे कथित अपहरण आणि लव्ह जिहादचा संबंध सध्या राज्यात गाजत आहेत. त्याचदरम्यान एक मोठी घडामोड घडली आहे. लव्ह जिहाद कायदा अंमलात आणण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाली वाढल्या आहेत. देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि बळजबरीने धर्मांतरावर अंकुश आणण्यासाठी राज्य सरकार सरसावल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी विशेष समितीच्या दोन ते तीन बैठका झाल्या असून या समितीने तयार केलेला मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आल्याचे समजते. राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठकी झाल्या. लव्ह जिहाद कायद्याचा पहिला मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती

लव्ह जिहाद आणि सक्तीच्या धर्मांतराविरोधात कायद्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी, फेब्रुवारी २०२५ मध्ये याविषयीची समिती स्थापन करण्यात आली होती. त्यात महिला आणि बालविकास, अल्पसंख्यांक विभाग, विधी व न्याय विभाग, सामाजिक न्याय आणि गृह विभागाच्या सचिवांचा समावेश आहे. या उच्चाधिकार समितीच्या आतापर्यंत २ ते ३ बैठका झाल्याचे समजते. नवीन कायदा, सर्व कसोट्यांवर उतरावा यासाठी खास मेहनत घेण्यात आल्याचे समजते. त्यासाठी देशातील ६ कायद्यांचा सखोल अभ्यास करण्यात आल्याचे समजते.

भाजप आमदार लव्ह जिहाद कायद्यासाठी आग्रही

राज्यात हिंदू तरुणींच्या फसवणुकीचे प्रकार वाढल्याचे समोर आल्याने भाजप आमदार आक्रमक झाले आहेत. सध्या पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील तरुणीचे कथित अपहरण प्रकरण गाजत आहे. अनेक ठिकाणी असे प्रकार वाढत असल्याने सक्तीचे धर्मांतरण, लव्ह जिहाद या प्रकाराला आळा घालण्यासाठी कायद्याचा वचक बसवण्याची मागणी करण्यात येत होती. देशात यापूर्वी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश, राजस्थान यासारख्या भाजप शासित राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा अस्तित्वात आहे. उच्चाधिकारी समितीने या राज्यातील कायद्याचा बारकाईने अभ्यास केला आहे. गेल्या काही दिवसात भाजप आमदार या कायद्यासाठी आग्रही होते. त्यानुसार राज्यात हा कायदा लवकर आणावा यासाठी हाचलाची सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या काही वर्षात लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतराविरोधात राज्यातील अनेक जिल्ह्यात हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला आहे. या जनआक्रोश मोर्चाचा दबाव राज्य सरकारवर आहे. याप्रकराला आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी केल्या जात होती. त्यादृष्टीने राज्य शासनाने कायदा आणण्याच्या हालचाली वाढल्याचे सध्या दिसत आहे.

अगोदर शेतकर्‍यांसाठी कायदा आणा

लव्ह जिहाद कायद्याची गरज नाही असे वक्तव्य काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी केले आहे. महाराष्ट्रात सरकारकडून राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कायद्याची तयारी सुरू आहे. मंत्री नितेश राणेंनी काल कायद्याबाबत सुतोवाच केले होते. सरकारला जो कायदा आणायचा आहे तो आणावा. पण हा पण कायदा आणावा की ज्या ठिकाणी शेतकरी आत्महत्त्या करत आहे, तर तिकडेच्या जिल्हाधिकारी यांना कारवाई करायला हवी. लव्ह जिहाद कायदा आणायच्या आधी शेतकर्‍यांसाठी कायदा आणावा. केंद्र सरकार व राज्य सरकार षडयंत्र करत आहे. कायदा समोर येऊ द्या.मग बघू. मला वाटत नाही कायदा आणायची गरज आहे, असे अस्लम शेख म्हणाले.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या