राज्यातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

| Updated on: May 12, 2021 | 4:19 PM

राज्यातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवण्याबाबत चर्चा होऊ शकते, असं सांगितलं जात आहे.

राज्यातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काळ वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सध्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु आहे. या बैठकीत राज्यातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवण्याबाबत चर्चा होऊ शकते, असं सांगितलं जात आहे. राज्यातील शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असला तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या लागू असलेला लॉकडाऊन वाढवण्याचं सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री आणि नेत्यांची भूमिका आहे. (Lockdown in Maharashtra is expected to increase)

राज्यातील 16 जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव, रुग्णांचा आकडा कमी होताना पाहायला मिळतोय. पण उर्वरित महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे. खासकरुन ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढत असल्याचं चित्र सध्या आहे. या पार्श्वभूमीवर नियमावलीत कुठलीही शिथिलता न देता लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे. याबाबत अंतिम निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेऊ शकतात, असंही सांगितलं जात आहे. दुसरीकडे ऑक्सिजन प्लॅन्ट मिशनसाठी 1 हजार 100 कोटी रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. तसंच 18 वर्षावरील नागरिकांना लस बंद करुन, पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी नियोजन करण्याबाबत बैठकीत निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर राज्यातील कोरोनाची स्थिती आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही या बैठकीत चर्चा होईल असं सांगण्यात येत आहे.

काही जिल्ह्यात लॉकडाऊन वाढवला

राज्यात काही जिल्ह्यामधील परिस्थिती सुधारत असली तरी काही जिल्ह्यात मात्र कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. अशावेळी राज्यातील काही जिल्ह्यात स्थानिक पाळतीवर लॉकडाऊनची नियमावली अधिक कडक करण्यात आली आहे. त्यात रुग्णालये आणि औषधी दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. प्रत्येक जिल्ह्यात तिथल्या परिस्थितीनुसार वेगवेगळे नियम लागू करण्यात आले आहेत.

कॅमेरामन, पत्रकारांना ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ घोषित करा – फडणवीस

विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्रं लिहिलं असून त्यात पत्रकारांच्या समस्यांकडे लक्ष वेधलं आहे. तसेच देशभरात अनेक राज्यांनी पत्रकार आणि कॅमेरामनना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्यात आल्याकडेही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे. इतर राज्यांच्या धर्तीवर आपणही पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केलं पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

कोरोनाची गावखेड्यात धडक! बारामती, माळेगाव हद्दीतील गावांमध्ये हाय अलर्ट जारी

हाहा:कार माजवणाऱ्या कोरोनाच्या नव्या प्रजातीचा भारतात उगम, अफवा की सत्य ? केंद्र सरकारनं दिली खरी माहिती

Lockdown in Maharashtra is expected to increase