कोरोनाची गावखेड्यात धडक! बारामती, माळेगाव हद्दीतील गावांमध्ये हाय अलर्ट जारी

बारामती नगरपरिषद, माळेगाव नगरपंचायतीसह अन्य 11 गावांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. तर 15 गावांमध्ये अलर्ट जारी केला गेलाय.

कोरोनाची गावखेड्यात धडक! बारामती, माळेगाव हद्दीतील गावांमध्ये हाय अलर्ट जारी
Corona Virus
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 2:40 PM

बारामती : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. आधी शहरांमध्ये थैमान घातलेल्या कोरोनाने आता गावखेड्यात धडक दिलीय. त्यामुळे तालुका आणि गाव पातळीवरील प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. बारामती नगरपरिषद, माळेगाव नगरपंचायतीसह अन्य 11 गावांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. तर 15 गावांमध्ये अलर्ट जारी केला गेलाय. बारामतीमध्ये मागील महिन्याभरात कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळतोय. दररोज सरासरी 300 ते 400 नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून रुग्णसंख्येवर आधारीत अलर्ट जारी करण्यात आला आहे. (High alert in Baramati Municipal Council and villages in Malegaon Municipality area)

बारामती तालुक्यात मागील दोन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय. रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्यानं सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे काही प्रमाणात रुग्णसंख्या कमी होतेय. बारामतीत आतापर्यंत 20 हजार 431 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.

बारामती नगर परिषदेतील हाय अलर्ट आणि अलर्टवर असणारी गावे –

हाय अलर्ट – बारामती नगर परिषद, माळेगाव नगर पंचायत, गुणवडी, मुढाळे, झारगडवाडी, होळ, कटफळ, सोनगाव, लाटे, मुरुम, काऱ्हाटी, सावळ, शिर्सूफळ.

अलर्ट – काटेवाडी, निरावागज, पणदरे, वंजारवाडी, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे बुद्रुक, डोरलेवाडी, पिंपळी, मळद, मेखळी, सांगवी, गोजुवाडी, खांडज, मोरगाव, कन्हेरी.

दुसरीकडे पुरंदर तालुक्यातील सासवड आणि जेजुरी या महत्वाच्या शहरांसह 9 गावे हाय अलर्ट आणि दहा गावे अलर्ट श्रेणीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

हाय अलर्ट – जेजूरी नगर परिषद, सासवड नगर परिषद, पिसर्वे, बेलसर, माळशिरस, वाल्हे, पिंपरे, पिंपरे खुर्द, राख, धालेवाडी, नाझरे क. प.

अलर्ट – दिवे, निरा, कोळविहीरे, वाघापूर, बीर, झेंडेवाडी, बाळदरी, पारगाव, परींचे, गुळूंचे.

बारामतीतील लॉकडाऊनची नियमावली?

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये 5 मे ते 11 मे दरम्यान लॉकडाऊन लागू आहे. यात दूध विक्रीसाठी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत मुभा असेल. तर मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. किराणा, भाजी मंडई या काळात बंद राहणार आहे.

अजित पवारांकडून आढावा

गेल्याच आठवड्यात अजित पवार यांनी बारामतीतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक घेत बारामती तालुक्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती अजित पवारांनी जाणून घेतली होती. अजित पवार यांनी बारामतीतल्या वाढत्या रुग्ण संख्येबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईत कोरोना रुग्ण डबलिंग रेट वाढला, अंधेरीत 120 दिवसांवर, विभागवार रुग्ण दुपटीचा कालावधी पाहा

Coronavirus: पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान; बाधित आणि मृतांच्या संख्येत मोठी वाढ

High alert in Baramati Municipal Council and villages in Malegaon Municipality area

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.