AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coronavirus: पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान; बाधित आणि मृतांच्या संख्येत मोठी वाढ

सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक मोठ्याप्रमाणावर दिसून येत आहे. | Coronavirus in Maharashtra

Coronavirus: पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान; बाधित आणि मृतांच्या संख्येत मोठी वाढ
प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: May 10, 2021 | 10:48 AM
Share

पुणे: एकीकडे मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा आलेख काहीसा स्थिरावत असताना पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात मात्र कोरोना हाहा:कार माजवताना दिसत आहे. रविवारच्या आकडेवारीनुसार पश्चिम महाराष्ट्रात काल दिवसभरात 219 कोरोना रुग्णांचा (Coronavirus) मृत्यू झाला. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक मोठ्याप्रमाणावर दिसून येत आहे. (Coronavirus surges in Western Maharashtra)

या चार जिल्ह्यांमध्ये मिळून रविवारी कोरोनाचे 6504 नवे रुग्ण आढळून आले. साताऱ्यात 2234 नवे रुग्ण आढळून आले. तर 59 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर सोलापूरात 52 जणांचा मृत्यू तर शहरी भागात 7 जणांचा मृत्यू व ग्रामीण भागात 45 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात काल दिवभरात 1 हजार 908 जणांना कोरोनाची लागण तर 2 हजार 625 जणांना देण्यात आला डिस्चार्ज देण्यात आला.

सांगलीतही अशीच चिंताजनक परिस्थिती आहे. काल दिवसभरात कोरोनाचे 1341 नवे रुग्ण आढळून आले तर 58 जणांनी जीव गमावला. तर कोल्हापूरमध्ये रविवारी एकाच दिवसात 50 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे हे चारही जिल्हे सध्या रेड झोनमध्ये आहेत.

देशभरात गेल्या 24 तासांत 3 लाख 66 हजार 161 कोरोना रुग्ण

गेले काही दिवस 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. मात्र गेल्या 24 तासात भारतात 3 लाख 66 हजार 161 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 754 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 53 हजार 818 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंत देशात 1 कोटी 86 लाख 71 हजार 222 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 26 लाख 62 हजार 575 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 46 हजार 116 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 37 लाख 45 हजार 237 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या:

तिसऱ्या लाटेपूर्वीच पुण्यात लहान मुलांना कोरोना संसर्ग! 1 वर्षाखालील 249 चिमुकल्यांना कोरोनाची लागण

आभाळच फाटले! एकापाठोपाठ तीन भावांचा कोरोनामुळे मृत्यू; पुण्यात हळहळ

आमच्यावर विश्वास ठेवा, सरकारच्या कोरोना धोरणात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही: केंद्र सरकार

(Coronavirus surges in Western Maharashtra)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.