मुंबईत कोरोना रुग्ण डबलिंग रेट वाढला, अंधेरीत 120 दिवसांवर, विभागवार रुग्ण दुपटीचा कालावधी पाहा

मुंबईत काल 2 हजार 403 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असले, तरी 3 हजार 375 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत (Corona Mumbai Doubling Rate increases)

मुंबईत कोरोना रुग्ण डबलिंग रेट वाढला, अंधेरीत 120 दिवसांवर, विभागवार रुग्ण दुपटीचा कालावधी पाहा
Corona Mumbai

मुंबई : मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या (Corona Cases in Mumbai) नियंत्रणात आल्याचं चित्र आहे. दैनंदिन रुग्णसंख्येची वाढ दहा हजारांवरुन थेट अडीच हजारांच्या घरात आली आहे. डबलिंग रेटही दीडशेपार गेल्यामुळे काहीसा दिलासा मानला जात आहे. मुंबईकरांनी आणखी धीर धरुन कोरोनाशी लढाई अशीच सुरु ठेवली तर मुंबईतील कोरोनाची दुसरी लाट पूर्ण नियंत्रणात येईल, असं मानलं जात आहे. (Corona Cases in Mumbai Second Wave in Control COVID Patient Doubling Rate increases)

मुंबईत काल 2 हजार 403 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असले, तरी 3 हजार 375 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे मुंबईत आता केवळ 47 हजार 416 सक्रिय कोरोनाग्स्त रुग्ण राहिले आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 153 दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 91 टक्के इतके झाले आहे.

मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी विभागवार

दहिसर – 89 दिवस
अंधेरी पूर्व – 120 दिवस
मालाड – 121 दिवस
कुलाबा – 121 दिवस
अंधेरी पश्चिम – 134 दिवस
भायखळा -135 दिवस
गोरेगाव – 135 दिवस
एल्फिन्स्टन – 139 दिवस
खार – 143 दिवस
वांद्रे – 143 दिवस
कुर्ला – 154 दिवस
ग्रॅण्ट रोड – 155 दिवस
चेंबूर – 159 दिवस
सॅण्डहर्स्ट रोड – 172 दिवस
भांडुप – 180 दिवस
मुलुंड – 205 दिवस
घाटकोपर – 215 दिवस
परळ – 217 दिवस
चेंबूर पश्चिम – 220 दिवस
मरिन लाईन्स – 277 दिवस

मुंबई महापालिकेने जारी केलेली आकडेवारी

9 मे, संध्या. 6 वाजता

24 तासात बाधित रुग्ण – 2,403

24 तासात बरे झालेले रुग्ण – 3,375

बरे झालेले एकूण रुग्ण – 6,13,498

बरे झालेल्या रुग्णांचा दर – 91%

एकूण सक्रिय रुग्ण- 47,416

दुप्पटीचा दर- 153 दिवस

कोविड वाढीचा दर (2 मे – 8 मे)- ०.44%

(Corona Mumbai Doubling Rate increases)

संबंधित बातम्या :

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास डार्क चॉकलेट खा; केंद्रीय आरोग्य मंत्र्याचा सल्ला

कोरोनाग्रस्तांचा आकडा अखेर चार लाखांच्या खाली, 24 तासातील कोरोनाबळीतही घट

(Corona Cases in Mumbai Second Wave in Control COVID Patient Doubling Rate increases)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI