Maharashtra Lockdown: मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक, लॉकडाऊन निश्चित, पॅकेज मिळणार का?

| Updated on: Apr 11, 2021 | 11:24 AM

Maharashtra lockdown update राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. Uddhav Thackeray

Maharashtra Lockdown: मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक, लॉकडाऊन निश्चित, पॅकेज मिळणार का?
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत चर्चा करण्यासाठी टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री या बैठकीनंतर  लॉकडाऊनबाबत निर्णय जाहीर करतील का हे पाहावे लागणार आहे.  उद्धव ठाकरे यांनी शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊन हा पर्याय असल्याचं म्हटलं होतं. राज्य सरकारनं लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास जनतेसाठी पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे. (Maharashtra corona update Uddhav Thackeray call meeting with task force on coronavirus outbreak lockdown may be imposed in state)

संजय राऊत यांच्याकडूनही लॉकडाऊनचे संकेत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना लॉकडाऊनला दुसरा पर्याय आहे का? असा सवाल केला. लोकांचा जीव वाचणं महत्वाचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर, नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतल्यास राज्यातील विरोधी पक्ष काय भूमिका घेणार असा सवाल देखील त्यांनी केला. संजय राऊत यांच्या संवादातून महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय जाहीर होणार असल्याचे संकेत मिळतात.

लॉकडाऊन झाल्यास पॅकेज मिळणार?

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊन जाहीर झाल्यास गरीब वर्गाला काय मदत देता येईल याबद्दल निर्णय घेतला पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. गरीबांना मदत देण्याची माझी भूमिका आहे, असं त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर बोलताना सांगतिलं होतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकार लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर आर्थिक मदतीचं पॅकेज जाहीर करणार का? हे पाहावं लागणार आहे.

लॉकडाऊनपूर्वी लोकांचा विचार करा, भाजपची भूमिका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना महत्वाचं मत मांडलं आहे. राज्यातील आमदारांचा विकासनिधी 2 कोटी रुपयांनी कमी करा आणि कामगारांना 5 हजार रुपये द्या, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. तत्पूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही लॉकडाऊनचा विचार करायचा असेल तर आधी लोकांचा विचार करा, असं मत मांडलं आहे.

संबंधित बातम्या:

‘राजकीय भूमिकेमुळेच फडणवीसांचा लॉकडाऊनला विरोध; उद्या मोदींनीच देशव्यापी लॉकडाऊन केला तर काय कराल?’

Maharashtra Lockdown : राज्यात लॉकडाऊन निश्चित! 2 दिवसांत निर्णय होणार, निर्बंध 8 की 14 दिवस?

(Maharashtra corona update Uddhav Thackeray call meeting with task force on coronavirus outbreak lockdown may be imposed in state)