ठाकरे मंत्रिमंडळाची बैठक, संजय राठोड ऑनलाईन हजर राहण्याची चिन्हं

| Updated on: Feb 17, 2021 | 9:44 AM

संजय राठोड 3 फेब्रुवारीला झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीला हजर होते. मात्र पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण समोर आल्यापासून ते नॉट रिचेबल आहेत (Sanjay Rathod Cabinet meeting online)

ठाकरे मंत्रिमंडळाची बैठक, संजय राठोड ऑनलाईन हजर राहण्याची चिन्हं
संजय राठोड, पूजा चव्हाण, उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : परळीतील तरुणी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) संशयाच्या भोवर्‍यात अडकलेले वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष लागलं आहे. संजय राठोड या बैठकीला ऑनलाईन हजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूजाच्या संशयास्पद मृत्यूनंतर राठोड नॉट रिचेबल आहेत. (Maharashtra Minister Sanjay Rathod likely to attend Cabinet meeting online)

संजय राठोड 3 फेब्रुवारीला झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीला हजर होते. मात्र पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण समोर आल्यापासून ते नॉट रिचेबल आहेत. मुंबईतील घरातही ते नसल्याची माहिती आहे. त्यातच संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चाही फेर धरत आहेत. परंतु सरकारकडून या वृत्ताचं खंडन करण्यात आलं आहे. राठोड अद्याप प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत, किंवा त्यांनी कुठल्याही माध्यमातून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाष्य केलेलं नाही. त्यामुळे ते थेट मंत्रालयात येऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावण्याची शक्यता कमीच आहे. त्याऐवजी ते ऑनलाईन उपस्थिती लावण्याची शक्यता वर्तवली जाते.

संजय राठोड कुठे आहेत?

पूजाने रविवारी 7 फेब्रुवारीला आत्महत्या केल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड नॉट रिचेबल आहेत. त्यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा त्यांच्यावरील आरोपही खोडून काढले नाहीत. त्यामुळे राठोड यांच्या भोवतीचा संशय अधिकच वाढला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून त्यांची गाडी (MH 01DP 7585) मंत्रालयाच्या प्रांगणात उभी आहे. संजय राठोड रविवारपर्यंत मुंबईत होते. मात्र त्यांच्या चर्चगेटमधील घरी ते नव्हते, तर फोनवरही त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे राठोड गाडी सोडून अज्ञातवासात कुठे निघून गेले? असा सवाल केला जात आहे.

पोहरादेवीला शरण?

नॉट रिचेबल असलेले संजय राठोड हे वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजेचे आराध्य दैवत असलेल्या पोहरादेवीला (Pohradevi) शरण जाण्याची शक्यता आहेत. पोहरादेवी देवस्थानात गुरुवारी ते या विषयावर मौन सोडण्याचीही शक्यता आहे. कारण पोहरादेवी हे बंजारा समाजाची (Banjara) काशी समजली जाते. इथे येऊन संजय राठोड आपली भूमिका मांडण्याची चिन्हं आहेत. नुकतीच सेवालाल जयंती झाली. यावेळी बंजारा समाजाने संजय राठोड यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. (Maharashtra Minister Sanjay Rathod likely to attend Cabinet meeting online)

बंजारा समाज पाठीशी

दरम्यान, संजय राठोड यांच्या पाठीशी बंजारा समाज उभा असल्याचं त्यांचे प्रतिनिधी सांगतात. बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी संस्थानच्या महंतांची काल बैठक पार पडली. यावेळी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांचं लक्ष्य ठरलेले बंजारा समाजाचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विरोधकांनी समाजाची बदनामी केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

संबंधित बातम्या :

धनंजय मुंडे आणि संजय राठोड दोन्ही प्रकरणं वेगवेगळी, उगाच गल्लत करु नका: संजय राऊत

भाजप नेत्यांची महिलांबाबतची डझनभर प्रकरणं सांगेन, संजय राठोड मीडिया ट्रायलचा बळी: वडेट्टीवार

(Maharashtra Minister Sanjay Rathod likely to attend Cabinet meeting online)