AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : शिंदे गटाला ज्याची भीती तेच झालं, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा अजित पवार यांच्या हाती, पाहा कोणाकडे कोणतं खातं?

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं समजत आहे. अशातच राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या खात्यांची संभाव्य यादी टीव्ही9 मराठीच्या सूत्रांना मिळाली आहे. यामध्ये शिंदे गटातील आमदारांची मोठी गोची होणार आहे.

Ajit Pawar : शिंदे गटाला ज्याची भीती तेच झालं, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा अजित पवार यांच्या हाती, पाहा कोणाकडे कोणतं खातं?
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 04, 2023 | 2:38 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा शपविधी झाल्यावर आता आणखी हालचाली वाढल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं समजत आहे. अशातच राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या खात्यांची संभाव्य यादी टीव्ही9 मराठीच्या सूत्रांना मिळाली आहे. यामध्ये शिंदे गटातील आमदारांची मोठी गोची होणार आहे. कारण संभाव्य यादीनुसार अजित पवार यांच्याकडेच महसूल खातं जाणार असल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं पाहायला मिळत होतं.

कोणाकडे कोणतं खातं?

अजित पवार यांच्याकडे महसूल, दिलीप वळसे-पाटील यांना सांस्कृतिक, धनंजय मुंडे यांना सामाजिक तर छगन भुजबळ यांच्याकडे ओबीसी आणि हसन मुश्रीफ यांना कामगार खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे परत राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडे जात असल्याचं पाहायला मिळत आहे.  महाविकास आघाडी सरकार असताना शिंदे गटातील आमदारांनी ते निधी देत नसल्याची तक्रार केली होती. मात्र आता परत एकदा अर्थाखातं हे अजित दादांकडे जाणार असल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याच्या चर्चांणाही उधान आलं आहे.

राष्ट्रवादीकडे अर्थ, जलसंपदा आणि बांधकाम ही खाती देऊ नका अशी मागणी शिंदे गटातील आमदारांनी केली आहे. अर्थ खातं त्यांना दिल्यास अजितदादा आमचं करिअर संपवतील असंही शिंदे गटातील आमदारांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. परंतु संभाव्य यादीमध्ये अजित पवार यांना महसूल खातं असण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे जाणाऱ्या खात्यांची संभाव्य यादी-

अजित पवार- महसूल खातं,  दिलीप वळसे -पाटील – सांस्कृतिक व कृषी खातं, धनंजय मुंडे- सामाजिक न्याय खातं, हसन मुश्रीफ- अल्पसंख्यांक आणि कामगार, आदित तटकरे- महिला व बाल कल्याण, धर्मराव आत्राम- आदिवासी विकास खातं, संजय बनसोडे- क्रीडा व युवक कल्याण आणि अनिल पाटील – अन्न व नागरी पुरवठा अशी राष्ट्रवादीली खाती असण्याची संभाव्या यादी समोर आली आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा