AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rain Alert: गुडन्यूज! बंगाल उपसागरातील चक्रीवादळामुळे कोसळधार, ऑक्टोबरच्या या तारखेला विदर्भासह मराठवाड्याला पाऊस झोडपणार

Maharashtra Rain Alert: बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ पुढे सरकत आहे, तशी महाराष्ट्रासाठी गुडन्यूज जवळ आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार ऑक्टोबरच्या या तारखेला विदर्भासह मराठवाड्याला पाऊस झोडपणार आहे.

Maharashtra Rain Alert: गुडन्यूज! बंगाल उपसागरातील चक्रीवादळामुळे कोसळधार, ऑक्टोबरच्या या तारखेला विदर्भासह मराठवाड्याला पाऊस झोडपणार
विदर्भासह मराठवाड्यात कोसळधार, चक्रीवादळाने पाऊस झोडपणार
| Updated on: Oct 24, 2026 | 10:33 AM
Share

Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे आणि लवकरच चक्रीवादळ हे पुढे सरकणार आहे. यामुळे दुष्काळाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळणार आहे. विदर्भ, मराठवाड्यासह खानदेश, पश्चिम महाराष्ट्र चिंब चिंब होणार आहे. चक्रीवादळ लवकरच तीव्र होण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा पुढे सरकल्यावर देशातील 13 राज्यांमधील हवामान बदलेल. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार ऑक्टोबरच्या या तारखेला विदर्भासह मराठवाड्याला पाऊस झोडपणार आहे.

पुढील आठवड्यात पावसाचा सांगावा

पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे पश्चिम-वायव्य दिशेने सरकरण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत कमी दाबाचा पट्टा अधिक सक्रिय होईल. लवकरच चक्रीवादळ पुढे सरकेल. या चक्रीवादळाचे नाव अर्णव असे आहे. या संभाव्य हवामान बदलाने राज्यात कोसळधार पडेल. 27 आणि 29 ऑक्टोबरदरम्यान राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यासह इतर भागात पावसाच्या सरी कोसळतील.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

या हवामान बदलाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. 27 आणि 29 ऑक्टोबरदरम्यान राज्यातील काही भागात पाऊस पडेल. विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण असेल. पाऊस चांगला झाल्यास रब्बी हंगामातील पिकांना वरदान ठरेल. आता येत्या तीन ते चार दिवसात हवामान अनुकूल राहिल्यास या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. तर रब्बी पिकांसाठी हा पाऊस संजीवनी ठरेल.

खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय हवामान विभागानं मच्छिमारांना शुक्रवारी संध्याकाळपासून ते येत्या बुधवारपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मच्छिमारांनी 25 ऑक्टोबरपर्यंत बंगाल उपसागराच्या पूर्व-मध्य आणि जवळपासच्या आग्नेय भागात न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान पश्चिम-मध्य आणि जवळच्या नैऋत्य भागात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

यापूर्वी 18 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले होते. चक्राकार वाऱ्यांपासून कर्नाटकपर्यत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील कोकण किनारपट्टीसह अमरावती आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला होता. आता पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे.

Follow Us
तुम्ही आरे केलं तर, आम्ही पण कारे करू...; प्रवीण दरेकरांचा सूचक इशारा
Pravin Darekar On Ramdas Kadam : तुम्ही आरे केलं तर, आम्ही पण कारे करू....; प्रवीण दरेकरांचा रामदास कदमांना सूचक इशारा
मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; AQI तब्बल....
Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; दादर चौपाटीवर दृश्यमानता घटली, AQI तब्बल....
जरांगेंना 500 कोटी देऊन कोणी उभं केलं? मंगेश ससाणेंचा खळबळजनक सवाल
Mangesh Sasane : मनोज जरांगेंना 500 कोटी देऊन कोणी उभं केलं? मंगेश ससाणेंचा खळबळजनक सवाल, नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगेंना तुम्हीच मोठं केलं ना, मग आता बाजूला का करता?
Chandrakant Khaire : मनोज जरांगेंना तुम्हीच मोठं केलं ना, मग आता बाजूला का करता? चंद्रकांत खैरेंचा रोख नेमका कोणाकडे?
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल