Maharashtra Rain : आजही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, उत्तर महाराष्ट्रात यलो तर विदर्भात ऑरेंज अलर्ट

| Updated on: Aug 20, 2021 | 10:02 AM

 गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिली होती मात्र राज्यात पुन्हा पावसाने कमबॅक केलं आहे. काल राज्याच्या बऱ्याच भागांत जोरदार पावसाने हजेरी लावलीय. आता आजही राज्यांतल्या  काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Maharashtra Rain : आजही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, उत्तर महाराष्ट्रात यलो तर विदर्भात ऑरेंज अलर्ट
Rain Update
Follow us on

मुंबई :   गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिली होती मात्र राज्यात पुन्हा पावसाने कमबॅक केलं आहे. काल राज्याच्या बऱ्याच भागांत जोरदार पावसाने हजेरी लावलीय. आता आजही राज्यांतल्या  काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या वतीने उत्तर महाराष्ट्रात यलो तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातला पावसाचा मुक्काम वाढला आहे. शनिवारपर्यंत राज्यात पावसाचा जोर राहणार आहे म्हणजेच आणखी दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. उत्तम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाने पिकांना जीवदान मिळालं आहे. धुळे नंदूरबार, नाशिक जिल्ह्यांतही जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद, नांदेड उस्माबादसह विदर्भातील जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचा जोर आणखी दोन दिवस राहिल, त्यानंतर पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

मुंबई, ठाणे, धुळे, नंदूरबार, जळगाव

विदर्भात ऑरेंज अलर्ट

नाशिक, पालघर, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

20 ऑगस्टला (आज) राज्यातील पावसाची स्थिती कशी?

20 ऑगस्टला अमरावती आणि नागपूरला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. विदर्भातील इतर जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज आहे. तर, उर्वरित महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज  हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मागील 24 तासांत कुठे किती पाऊस?

(Maharashtra Rain weather Alert Todays heavy Rain By IMD)

संबंधित बातम्या :

Weather Alert today : मुंबईत जोरदार तर अर्ध्या महाराष्ट्रात मुसळधार, कुठे कुठे पाऊस पडणार?

Weather Alert today : मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज, कुठे कुठे पाऊस बरसणार?

Weather Alert: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, नेमका पाऊस कुठं पडणार?