Weather Alert today : मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज, कुठे कुठे पाऊस बरसणार?

महाराष्ट्रात आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्यावतीनं हा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीच्या वतीनं आज आणि उद्या महाराष्ट्र, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सचिन पाटील

Aug 19, 2021 | 8:53 AM

महाराष्ट्रात आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्यावतीनं हा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडतोय. उत्तर कोकणात ठाणे , पालघर आणि मुंबई मध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या शुभांगी भुते यांनी वर्तवला आहे.

आयएमडीच्या वतीनं आज आणि उद्या महाराष्ट्र, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिली आहे. तर, आजच्य दिवसासाठी यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, बुलडाणा, वाशिम, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें