Weather Alert today : मुंबईत जोरदार तर अर्ध्या महाराष्ट्रात मुसळधार, कुठे कुठे पाऊस पडणार?

  राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत सकाळपासून पावसाची रिमझिम आहे. दिवसभरात मुंबईत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Weather Alert today : मुंबईत जोरदार तर अर्ध्या महाराष्ट्रात मुसळधार, कुठे कुठे पाऊस पडणार?
Rain Update


मुंबई :  राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत सकाळपासून पावसाची रिमझिम आहे. दिवसभरात मुंबईत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाकडून राज्यांतील विविध जिल्ह्यांना कुठे यलो अलर्ट तर कुठे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रात आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई विभागाच्या वतीनं हा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडतोय. उत्तर कोकणात ठाणे, पालघर आणि मुंबई मध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या शुभांगी भुते यांनी वर्तवला आहे.

 कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज

आयएमडीच्या वतीनं आज आणि उद्या महाराष्ट्र, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

यवतमाळला ऑरेंज अलर्ट, तर 14 जिल्ह्यांना यलो अलर्ट

आजच्या दिवसासाठी यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, बुलडाणा, वाशिम, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

19 आणि 20 ऑगस्टला राज्यातील पावसाची स्थिती कशी?

उद्या महाराष्ट्रात बुलडाणा, अकोला, वाशिम, नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर 20 ऑगस्टला अमरावती आणि नागपूरला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. तर, उर्वरित महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

(Maharashtra mumbai Weather Alert todays heavy Rain By IMD)

हे ही वाचा :

Weather Alert today : मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज, कुठे कुठे पाऊस बरसणार?

Weather Alert: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, नेमका पाऊस कुठं पडणार?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI