मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट, लसवंतांना एका दिवसाचं लोकल प्रवासाचं तिकीट द्या, ठाकरे सरकारचं रेल्वेला पत्र

| Updated on: Oct 31, 2021 | 10:34 AM

राज्य सरकारनं लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी दिवाळी भेट दिली आहे. लसवंतांना एक दिवसासाठी लोकल प्रवासाचं तिकीट द्यावं,असं पत्र राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनानाला पत्र लिहिलं आहे.

मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट, लसवंतांना एका दिवसाचं लोकल प्रवासाचं तिकीट द्या, ठाकरे सरकारचं रेल्वेला पत्र
लोकल ट्रेन
Follow us on

अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई: राज्य सरकारनं लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी दिवाळी भेट दिली आहे. लसवंतांना एक दिवसासाठी लोकल प्रवासाचं तिकीट द्यावं,असं पत्र राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनानाला पत्र लिहिलं आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर 14 दिवस झालेल्या नागरिकांना प्रवासासाठी तिकीट देण्यात यावं असं पत्र राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनाला दिले आहे.

एका दिवसाच्या प्रवासाचं तिकीट मिळणार

मुंबईकरांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. गेल्या तीन चार दिवसांपूर्वी रेल्वे प्रवाशांसाटी सिझन तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांना रोजच्या प्रवासासाठी तिकीट न देण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला होता.त्यामुळे रेल्वे स्टेशनवर वाद होत होते. आता राज्य सरकारनं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना  किंवा इतरांनाही एका दिवसाच्या प्रवासाचं तिकीट देण्यात यावं यासाठी पत्र लिहिलं आहे. याशिवाय कोरोना लस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींना लोकल प्रवासाचं तिकीट द्यावं. रेल्वे प्रशासनानं यासंदर्भातील खात्री करावी आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असं पत्र राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं रेल्वेला दिलं आहे.

लसवंतांना मिळणार एका दिवसाचं तिकीट

राज्य सरकारनं रेल्वेला दिलेल्या पत्रात कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींना एका दिवसासाठीच्या प्रवासाचं तिकीट देण्यात यावं, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही एक प्रकारची दिवाळी भेट ठरली आहे.

अत्यावश्यक सेवेत नसणाऱ्यांना मिळणार तिकीट

पत्रात लसीकरण पूर्ण झालेल्या, अत्यावश्यक सेवेत असलेल्या किंवा नसलेल्या, अश्या सर्वच प्रवाश्यांना एक दिवसीय तिकीट देण्यात यावे अशी विनंती केली आहे, त्यासाठी रेल्वेने अतिरिक्त कर्मचारी स्थानकावर ठेवावे, फक्त लसीकरण झालेले प्रवासीच तिकीट आणि पास घेत आहेत याची खात्री करावी, कोविड नियम पाळले जात आहेत याची खात्री करावी, अशा सूचना देखील राज्य सरकारने केल्याचे पत्रात आहे

परीक्षार्थींना आणि परीक्षेच्या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासासाठी परवानगी द्या

ठाकरे सरकारनं शनिवारी सक्षम प्राधिकरणाच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी प्रविष्ठ होणारे परीक्षार्थी आणि कर्मचारी यांना एका दिवसासाठी प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशा आशयाचं पत्र रेल्वे प्रशासनाला लिहिलं आहे राज्य सरकारच्यावतीनं देण्यात आलेल्या पत्रावर रेल्वे प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.

इतर बातम्या

मलिक आता वानखेडेवर वैयक्तिक आरोप करतायत? यास्मिन वानखेडेंबद्दल फोटो ट्विट करत सवाल

‘आर्यन खाननंतर वेळ मिळाला तर राज्यातील शेतकऱ्यांकडे पाहा’, विनायक मेटेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

Maharashtra Uddhav Thackeray Government wrote letter to Railway to gave ticket to fully corona vaccinated people for local journey