कोणतंही काम सोपं नसतं, वडिलांचे केस स्वत: कापले : सत्यजीत तांबे

| Updated on: Apr 10, 2020 | 3:06 PM

लॉकडाऊनमुळे हेअर कटिंग सलूनदेखील बंद आहे. त्यामुळे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे (Maharashtra youth congress president Satyajeet Tambe) यांनी आपले वडील आमदार डॉ. सुधीर तांबे यांची घरातल्या घरात हेअर कटिंग केली.

कोणतंही काम सोपं नसतं, वडिलांचे केस स्वत: कापले : सत्यजीत तांबे
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाऊन (Maharashtra youth congress president Satyajeet Tambe) घोषित करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे जीवनाश्यक वस्तू वगळता सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांबरोबरच सेलिब्रिटी ते नेतेमंडळींनादेखील याचा फटका बसताना दिसत आहे. लॉकडाऊनमुळे हेअर कटिंग सलूनदेखील बंद आहे. त्यामुळे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आपले वडील आमदार डॉ. सुधीर तांबे यांची घरातल्या घरात हेअर कटिंग केली आहे. याबाबत त्यांनी आपला अनुभव फेसबुकवर शेअर केला आहे (Maharashtra youth congress president Satyajeet Tambe).

“कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आता नविनचं संकट आलं आहे. सगळे हेअर कटिंग सलून बंद असल्याने केस कसे कापायचे? हा प्रश्नच निर्माण झाला. मात्र, आम्ही यावर घरगुती उपाय शोधला. मी स्वत: माझ्या पप्पांचे केस कापले.लहानपणापासून आमचा नेहमीचा हेअर ड्रेसर द्वारका पवार याचं काम बघून मला कायम वाटायचं की केस कापणे म्हणजे सोपंच काम असे. आपण केस कापणाऱ्याला नेहमी असं काप किंवा तसं काप अशा सूचना देत असतो. आज पप्पांचे केस कापताना जगात कुठलेच काम सोपे नाही आणि कामापेक्षा मोठा कोणता धर्म नाही या एका गोष्टीची जाणीव झाली”, असं सत्यजीत तांबे म्हणाले.

आपल्याला या कामात मुलगी अहिल्यानेदेखील साथ दिल्याचं सत्यजित तांबे म्हणाले. सत्यजीत यांनी आपल्या वडिलांचे हेअर कटिंग करण्याचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंना हजारो लोकांनी लाईक केले आहेत. याशिवाय अनेकांनी सत्यजीत तांबे यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. कोणतंही काम सोपं नसतं. मात्र सत्यजीत यांनी प्रयत्न केला, याबाबत त्यांचं कौतुक केलं जात आहे.