‘वंचित’ महाविकास आघाडीत येणार?; पवार-आंबेडकर भेटीनतर राजकीय घडामोडींना वेग

| Updated on: Apr 22, 2023 | 10:13 PM

काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबडेकर आणि उद्धव ठाकरे यांचीही भेट झाली होती. त्यावेळीही शिवसेना आणि वंचित अशा युतीची शक्यता वर्तवली जात होती.

वंचित महाविकास आघाडीत येणार?; पवार-आंबेडकर भेटीनतर राजकीय घडामोडींना वेग
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार असल्याची चर्चा सुरु आहे, कारण त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून जाहिरपणे शरद पवार यांच्यावर टीकाही केली जाते. तर काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनीच वंचित आणि मविआचे एकत्र येणार असा सवाल उपस्थित केल्या नंतर त्यांनी तशी शक्यता नसल्याचेही स्पष्टच सांगितले होते. तर आता आंबेडकर आणि पवार यांची भेट झाल्याने आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र आले तर आगामी काळातील निवडणुकीत मात्र त्याचा फायदा मविआलाच होण्याची शक्यता आहे.

कारण 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे महाविकास आघाडीच्या जागांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये वंचितची एंट्री झाली तर मात्र त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा जर मविआमध्ये समावेश झाला तर मात्र त्याचा सकारात्मक परिणाम महाविकास आघाडीला होणार आहे.

काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबडेकर आणि उद्धव ठाकरे यांचीही भेट झाली होती. त्यावेळीही शिवसेना आणि वंचित अशा युतीची शक्यता वर्तवली जात होती.

त्या भेटीनंतर काही नेत्यांनी फक्त शिवसेनेबरोबर युती करण्यापेक्षा महाविकास आघाडीमध्ये जर वंचितचा समावेश झाला तर त्याचा फायदा वंचितलाही होईल अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या.

त्यामुळे आता पुन्हा एकदा शरद पवार यांची प्रकाश आंबडेकर यांची भेट घेतल्यामुळे मविआमध्ये वंचितची एंट्री अशी आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.