चेंबूरच्या वाशीनाका परिसरात FDA ची मोठी कारवाई, कँडी ज्यूसचा मुदत संपलेला साठा जप्त

एफडीएने चेंबूर वाशीनाका परिसरात मोठी कारवाई करीत मुदत संपलेल्या कॅण्डी ज्यूसचा साठा जप्त केला आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

चेंबूरच्या वाशीनाका परिसरात FDA ची मोठी कारवाई, कँडी ज्यूसचा मुदत संपलेला साठा जप्त
fda news
| Updated on: Aug 13, 2026 | 7:32 PM

चेंबर वाशीनाका परिसरात एफडीएने मोठी कारवाई केली आहे. येथील गडकरी खदानजवळील प्रयागनगर परिसरातील नामांकित कॅन्डी ज्युस गोदामावर छापा टाकत एफडीएने मुदत संपलेल्या ज्युसचा मोठा साठा जप्त केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गेले काही दिवस अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार सांभाळल्यानंतर भेसळ खोरांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे. दूध भेसळीपासून या कारवाईची सुरुवात झाली होती. आता प्रत्येक अन्नपदार्थांकडे एफडीएची नजर वळली आहे.

चेंबुर वाशीनाका भागातील गडकरी खदानजवळ प्रयागनगर भागात नामांकित कँडी ज्युसच्या गोदामावर एफडीएने मोठा छापा टाकत कारवाई केल्याची माहिती उघडकीस आली आहे. या गोदामात मुदत संपलेल्या ज्युसचा मोठा साठा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार FDA अधिकाऱ्यांनी येथे छापा टाकत तपासणी सुरू केली आहे. गोदामातील ज्युस उत्पादनांची एक्सपायरी डेट तपासण्याचे काम सुरू आहे. संशयास्पद साठ्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जाण्याची शक्यता आहे. या कारवाईदरम्यान नेमका किती साठा आढळला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. FDA च्या तपासणीनंतर पुढील कारवाई काय होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

तुकाराम मुंढे यांचा सपाटा…

राज्यभर फसव्या जाहिरातींसह अन्नपदार्थांत केमिकलचा वापर, भेसळयुक्त खवा, तूप, पनीर, बनावट औषधं आणि अवैध गुटखा अशा सर्वच अन्न पदार्थाच्या भेसळी विरोधात तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील विभागाने कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तुकाराम मुंढे यांची प्रशासकीय सेवेच्या काळात 21 वर्षांत तब्बल 25 वेळा बदली झाली आहे. यामुळे या एफडीएच्या पदावर ते आता किती काळ राहातात याविषयी देखील चर्चा सुरु आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us