बाईक उभी करु न दिल्याने जवानाला बेदम मारहाण

मुंबई : मुंबईच्या टिळक नगर रेल्वे स्थानक येथे MSF (Maharashtra Security Force) जवानाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना काल (19 मे) संध्याकाळच्या सुमारास घडली. रेल्वे स्थानकाच्या बुकिंग काऊंटर आरोपीला MSF जवानाने बाईक लावून न दिल्याने आरोपीने थेट जवानावर हल्ला केला. यावेळी आरोपीने घरातील कुटुंबाना बोलावून जवानाला बेदम मारहाण केली आहे. शंकर असं जवानाचे […]

बाईक उभी करु न दिल्याने जवानाला बेदम मारहाण
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : मुंबईच्या टिळक नगर रेल्वे स्थानक येथे MSF (Maharashtra Security Force) जवानाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना काल (19 मे) संध्याकाळच्या सुमारास घडली. रेल्वे स्थानकाच्या बुकिंग काऊंटर आरोपीला MSF जवानाने बाईक लावून न दिल्याने आरोपीने थेट जवानावर हल्ला केला. यावेळी आरोपीने घरातील कुटुंबाना बोलावून जवानाला बेदम मारहाण केली आहे. शंकर असं जवानाचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी रेल्वे स्थानकावर आपल्या पत्नीला सोडण्यासाठी आला होता. यावेळी आरोपीने बाईक रेल्वे स्थानकाच्या तिकिट काऊंटर जवळ लावली होती. तिकिट काऊंटरजवळ बाईक लावण्यास MSF जवानाने विरोध केला. बाईक लावू न दिल्याने आरोपीही जवानाला उलट उत्तर देत हुज्जत घालू लागला. यावेळी आरोपीने आपल्या नातेवाईकांना बोलावून जवनाला बेदम मारहाण केली आणि नंतर तो तिथून त्यांनी पळ काढला. विशेष म्हणजे, आरोपी स्वत:ला मी रेल्वे कर्मचारी असल्याचे सांगत होता.

या घटनेची तक्रार नेहरु नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनीही सीसीटीव्हीच्या आधारे चार जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये एकजण वकील आहे.

दरम्यान, रेल्वे पोलिसांच्या मदतीसाठी MSF जवानांना रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आलं आहे. मात्र जवानांवरच असे हल्ले होत असतील, तर ही खूप गंभीर घटना आहे.