मराठा मोर्चाची बातच न्यारी, रस्त्यावर आंघोळ, मिळेल तिथे डुलकी, भल्या पहाटे 3 वाजता मनोज जरांगेंची ती खास मिटिंग, आंदोलनाची A टू Z माहिती

Manoj Jarange Maratha Morcha : मराठा आंदोलकांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. मराठा समाज आरक्षणावर ठाम आहे. अभुतपूर्व गर्दीने सत्ताधाऱ्यांचाच नाही तर विरोधकांचा सुद्धा अंदाज चुकला आहे. हालअपेष्टा सहन करत मराठा बांधव मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. काय अपडेट?

मराठा मोर्चाची बातच न्यारी, रस्त्यावर आंघोळ, मिळेल तिथे डुलकी, भल्या पहाटे 3 वाजता मनोज जरांगेंची ती खास मिटिंग, आंदोलनाची A टू Z माहिती
मनोज जरांगे पाटील
| Updated on: Aug 31, 2025 | 8:55 AM

मराठा आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचाही तिसरा दिवस आहे. जरांगे हे उपोषणावर असले तरी त्यांनी आंदोलकांना जेवण मिळते आहे की नाही, त्यांची झोपण्याची व्यवस्था झाली का, याची विचारपूस केली. त्याचा आढाव घेतला. भल्या पहाटे 2 ते 3 वाजेदरम्यान त्यांनी खास मिटिंग सुद्धा घेतली. ओबीसीतून आरक्षणासाठी या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सत्ताधारीच नाही तर विरोधकांचाही अंदाज या गर्दीने चुकवला आहे. जर आंदोलन चिघळले तर कदाचित विक्रमी गर्दीने मुंबईची कोंडी होण्याची शक्यता आतापासूनच वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने आता अधिकचा उशीर करण्याऐवजी चर्चेच्या फेऱ्या वाढवण्याची अपेक्षा आंदोलकांनी वर्तवली आहे.

मध्यरात्री जरांगेंनी घेतला आढावा

मध्यरात्री पासून मनोज जरांगे पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. आंदोलकांना जेवण आणि इतर गोष्टीची योग्य पूर्तता होत आहे की नाही याची त्यांनी विचारपूस केली. त्यानंतर त्यांच्या सहकार्यनसोबत गप्पा मारल्या. त्यात अनेक कार्यकर्त्याना भेटले. त्यांनी कोणते आंदोलक कुठे आहेत. त्यांची वाहनं कुठं लावली आहेत. त्यांच्या जेवणाची आणि झोपण्याची काय सोय आहे, याचा आढावा त्यांनी घेतला.

दरम्यान आज सकाळी आंदोलकांनी रस्त्यावरच आंघोळी केल्या. मिळेल तिथे त्यांनी आंघोळी केल्या. मराठा बांधव मिळेल त्या भागात आपली वाहन पार्क करत आहे चहा आणि नाश्ता बनवत आहेत.चहा नाश्ता करून पुन्हा एकदा आजाद मैदान परिसरामध्ये हे मराठा बांधव दाखल होणार.

आणि मनोज जरांगे पाटील भडकले

भल्या पहाटे सुमारे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान पाटील आपल्या कार्यकर्ते यांच्याशी गप्पा मारताना एक संशयित व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांचा व्हिडीओ काढत होता. त्यावर जरांगे पाटील त्यावर वैतागले आणि हा माणूस कोण आहे याचा तपास घ्या असे आपल्या कार्यकर्त्याना आदेश दिले. त्यावेळी ती व्यक्ती नशेत असल्याचे समोर आले.

त्यांनी मी कार्यकर्ते असे सांगितले परंतु असे कार्यकते आमचे नाहीत असे ठणकावून जरांगेनी सांगितले ,तर पोलीस कुठे आहेत असा सवाल जरांगे यांनी आपल्या कार्यकर्त्याना विचारला असता त्यावेळी एकही पोलीस मंडपात दिसला नाही. या घटने नंतर ही पोलीस मंडपात फिरकले नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कार्यकर्त्यांकडून तब्येतीची विचारपूस

मनोज जरांगे पाटील यांची तब्बेतीची आंदोलक, कार्यकर्त्यांकडून विचारपूस करण्यात आली. तर जरांगे यांचे हृदयाचे ठोके ( पल्स )देखील तपासण्यात आले. मनोज जरांगे सव्वा एक ते सव्वा तीन दोन तास जागे होते. त्यात ते आपल्या वॅनिटी मध्ये देखील 5 मिनिट गेले होते. त्या नंतर त्यांची प्रकृती तपासण्यात आली. या दरम्यान जरांगे यांनी मराठा आंदोलनकाची देखील भेट घेतली.

सामाजिक संस्था मदतीसाठी धावल्या

जुन्नर येथील सामाजिक संस्थेकडून मराठा बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला. जीवनावश्यक वस्तू मुंबईत दाखल करण्यात आल्या. दोन लाख मराठा बांधवांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसभरामध्ये पंधरा ते वीस हजार जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. मराठा बांधवांची दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असल्याचे मराठा बांधवांकडून आरोप करण्यात आला होता त्यानंतर मुंबईमध्ये सामाजिक संस्था मराठा महासंघ यांच्याकडून मदतीचा ओघ मुंबईमध्ये सुरू झाला आहे.

मुंबईमध्ये दोन लाख लोकांसाठी जीवनावश्यक असणाऱ्या वस्तू यामध्ये तांदूळ बटाटा कांदा गॅस कडधान्य भाजी मसाले शेगडी गॅस सिलेंडर, जेवण करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य हे सर्व वस्तू आणण्यात आले आहेत. सहा टन सामान आणण्यात आलेले आहे. त्यामुळे मराठा बांधवांचे हाल होऊ नये यासाठी ही सोय करण्यात आली आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मदतीचा ओक आम्ही देतच राहणार अशा सामाजिक संस्थेकडून सांगण्यात येत आहे.बीड प्रकरणातील रंजीत कासले यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. सध्या पोलीस सेवेतून बडतर्फ असल्याने रंजीत कासले मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी असल्याचे ते म्हणाले.