Mansukh Hiren Case : स्कॉर्पिओ झाली, इनोव्हाही झाली, आता वाझे-मनसुख प्रकरणात तिसऱ्या गाडीची एन्ट्री, वाचा EXCLUSIVE रिपोर्ट

| Updated on: Mar 16, 2021 | 12:20 AM

स्कॉर्पिओसोबत एक इनोव्हा गाडीही तिथे आल्याचं निदर्शनास आलं होतं. या 2 गाड्यांनंतर आता एक तिसऱ्या गाडीबाबत धक्कादायक माहिती समोर येतेय. त्या गाडीचा शोध आता NIA घेत आहे.

Mansukh Hiren Case : स्कॉर्पिओ झाली, इनोव्हाही झाली, आता वाझे-मनसुख प्रकरणात तिसऱ्या गाडीची एन्ट्री, वाचा EXCLUSIVE रिपोर्ट
Follow us on

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात रोज नवी माहिती समोर येत आहे. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ 22 फेब्रुवारी रोजी एक स्पॉर्पिओ आढळून आली होती. त्यात जिलेटीनच्या कांड्या सापडल्यानं एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही तपासलं असता स्कॉर्पिओसोबत एक इनोव्हा गाडीही तिथे आल्याचं निदर्शनास आलं होतं. या 2 गाड्यांनंतर आता एक तिसऱ्या गाडीबाबत धक्कादायक माहिती समोर येतेय. त्या गाडीचा शोध आता NIA घेत आहे.(New CCTV footage in the hands of NIA in Mansukh Hiren case)

संपूर्ण प्रकरणात मर्सिडिज कारची भूमिका महत्वाची

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना NIAनं अटक केली आहे. त्यानंतर रोन नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझे प्रकरणात इनोव्हा कारची माहिती मिळाल्यानंतर एनआयए आता एका मर्सिडिज कारच्या शोधात आहे. या संपूर्ण प्रकरणात या मर्सिडिज कारची भूमिका स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ इतकीच महत्वाची राहिली आहे.

NIA च्या हाती महत्वाचं सीसीटीव्ही फुटेज

या प्रकरणात NIAच्या हाती एका मर्सिडिज कारचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं आहे. हे सीसीटीव्ही फुटेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेरचं असल्याचं सांगण्यात येत आहे. याच मर्सिडिजमध्ये स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांनी प्रवास केला होता. NIAला मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मनसुख हिरेन कुणाची तरी वाट पाहत होते असं दिसतंय. काही वेळाने त्यांच्याजवळ ही मर्सिडिज कार येते. हिरेन त्या गाडीत बसून निघून जात असल्याचं त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे. NIAच्या हाती लागलेलं हे सीसीटीव्ही फुटेज मनसुख हिरेन बेपत्ता होण्याच्या काळातलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

‘ती’ मर्सिडिज मिळाल्यास प्रकरणातील गूढ समोर येणार

मनसुख हिरेन त्या दिवशी कुणासोबत गेले होते. ती मर्सिडिज कुणाची होती, याचा तसाप आता एनआयए करत आहे. मर्सिडिजचा शोध लागला तर मनसुख हिरेन प्रकरणात अजून कोण-कोणत्या मोठ्या व्यक्तींचा सहभाग आहे, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विरोधकांनी केलेल्या दाव्यानुसार मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे हे फक्त एक प्यादं आहे. यात अनेक बड्या लोकांचे हात गुंतल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ती मर्सिडीज नेमकी कुणाची? याचा शोध एनआयएला लागल्यानंतर या प्रकरणातील गूढ समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीतल्या खांदेपालटाची चर्चा जोरात, पवारांची कोअर नेत्यांसोबत बैठक, काय म्हणाले जयंत पाटील बैठकीनंतर?

सचिन वाझे यांना मधुमेहाचा त्रास, जेजे रुग्णालयात विविध आरोग्य तपासण्या

Riyaz Kazi : वाझेनंतर NIA चौकशी करत असलेले API रियाझ काझी कोण आहेत?

New CCTV footage in the hands of NIA in Mansukh Hiren case