AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीतल्या खांदेपालटाची चर्चा जोरात, पवारांची कोअर नेत्यांसोबत बैठक, काय म्हणाले जयंत पाटील बैठकीनंतर?

गृहमंत्री बदलण्याचा किंवा मुंबई पोलिस आयुक्तांची उचलबांगडी करण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा सुरु आहे. पण असा कुठलाही निर्णय किंवा चर्चा सुरु नसल्याचं जलसंपदामंत्री आमि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादीतल्या खांदेपालटाची चर्चा जोरात, पवारांची कोअर नेत्यांसोबत बैठक, काय म्हणाले जयंत पाटील बैठकीनंतर?
jayant patil
| Updated on: Mar 15, 2021 | 7:31 PM
Share

मुंबई : सचिन वाझे प्रकरणी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राज्य सरकारकडून गृहमंत्री बदलण्याचा किंवा मुंबई पोलिस आयुक्तांची उचलबांगडी करण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा सुरु आहे. पण असा कुठलाही निर्णय किंवा चर्चा सुरु नसल्याचं जलसंपदामंत्री आमि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. दिवसभरातील महत्वाच्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.(Jayant Patil says NCP has no plans to change the Home Minister)

पूजा चव्हाण ते सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री अनिल देशमुख कमी पडले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी बदनामी झाली. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरुन हटवलं जाऊ शकतं, त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली सुरु असल्याचं आज दिवसभर बोललं जात होतं. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठकही पार पडली होती. या बैठकीत सचिन वाझे प्रकरणी चर्चा झाल्याचंही बोललं जात आहे.

‘गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही’

गृहमंत्री अनिल देशमुख चांगलं काम करत आहेत. राज्याचे गृहमंत्री बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बाहेर याबाबत कितीही वावड्या उठत असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी कुठलीही चर्चा सुरु नाही. त्यामुळे गृहमंत्रीपदी अनिल देशमुखच कायम राहतील, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

‘दोषी असेल त्याला योग्य प्रायश्चित घ्यावं लागेल’

दरम्यान, या प्रकरणी तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीनंतर जो कोणी दोषी आढळेल त्याला योग्य ते प्रायश्चित घ्यावं लागेल, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. या प्रकरणात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होत नाही. गृहमंत्र्यांनी त्यांना मिळेल तशी माहिती माहिती सभागृहात दिली आहे. गृहमंत्र्यांनी सभागृहात मांडलेली भूमिका ही त्या त्या वेळी योग्य होती. या प्रकरणात कुठल्या अधिकाऱ्याच्या सहभाग असेल तर तपास यंत्रणेनं याबाबत निष्कर्ष काढल्यानंतर बोलणं योग्य ठरेल असंही देशमुख यांनी म्हटलंय.

राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा – पाटील

मुख्यमंत्री आणि पवारांच्या बैठकीनंतर संध्याकाळच्या सुमारास शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण सभागृहात वेगळी बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, नवाब मलिक, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीत मंत्र्यांच्या कामांचा आढावा आणि राज्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

मी सुसंस्कृत घरातला, राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय, सरदेसाईंचं उत्तर

VIDEO: देशमुखांना बदललं जाणार की पोलीस आयुक्तांना?; वाचा, राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्याची पहिली प्रतिक्रिया

Jayant Patil says NCP has no plans to change the Home Minister

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.