VIDEO: देशमुखांना बदललं जाणार की पोलीस आयुक्तांना?; वाचा, राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्याची पहिली प्रतिक्रिया

सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदललं जाणार की मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंह यांना हटवलं जाणार? अशी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. (jayant patil first reaction on anil deshmukh's ministry)

VIDEO: देशमुखांना बदललं जाणार की पोलीस आयुक्तांना?; वाचा, राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्याची पहिली प्रतिक्रिया
Jayant Patil
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 4:47 PM

मुंबई: सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदललं जाणार की मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंह यांना हटवलं जाणार? अशी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. अनिल देशमुख यांच्याकडेच गृहमंत्रीपद राहणार आहे. राज्यात कोणतंही खातेबदल होणार नाही. त्यामुळे वावड्या उठवण्याची गरज नाही, असा खुलासा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना राष्ट्रवादीकडून अभय देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. (jayant patil first reaction on anil deshmukh’s ministry)

आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होती. या बैठकीत सहभागी होण्यासाठी जयंत पाटील आले होते. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी गृहमंत्री बदलला जाणार नाही आणि राज्यात खातेपालट होणार नसल्याचं स्पष्ट केलं. वझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोणतीही चूक केलेली नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा मागण्याचा प्रश्नच येणार नाही. गृहमंत्री बदलण्याचा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर आलेला नाही, असंही त्यांनी सांगितलं.

वावड्या उठवू नका

गृहमंत्रीपदासाठी तुमचं आणि अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तुमच्या नावाला हिरवा कंदीलही दाखविण्यात आला आहे, त्याबाबत तुमची प्रतिक्रिया काय? असं पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावर याला हिरवा कंदील, त्याला हिरवा कंदील असं काही नाही. तुम्हीही या वावड्या उठवू नका, असं पाटील म्हणाले.

चूक केली असेल तर शिक्षा होईलच

वझे यांना एनआयएने ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर जी शिक्षा व्हायची ती होईल. आधी या प्रकरणाचा एटीएस तपास करत होती. आता एनआयए करत आहे. एटीएसने तपास केला असता तरी जे सत्य बाहेर यायचं ते आलंच असतं, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. कोणी कशात गुंतलेले असतील. काही चूक केली असेल तर त्यांना त्यांचं प्रायश्चित मिळालंच पाहिजे ही सरकारची भूमिका आहे, असंही ते म्हणाले.

पवार-ठाकरे भेट रुटीन

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आजची भेट रुटीन होती. ही भेट आधीच ठरली होती. पवार नेहमी मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. या भेटीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असते. त्यामुळे पवार-ठाकरे यांची भेट ही रुटीन होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पवारच बोलतील

पक्षाचा कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो शरद पवारच घेत असतात. त्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मी या प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

एनआयए आलीच कशी?

अँटालिया प्रकरणाचा तपास एटीएस करत असताना एनआयएची गरज नव्हती. एनआयएला हा तपास दिलाच कसा? असा सवाल काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. (jayant patil first reaction on anil deshmukh’s ministry)

संबंधित बातम्या:

LIVE | गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नाही, खांदेपालट होण्याची शक्यता नाही : जयंत पाटील

वाझेप्रकरणी ठाकरे सरकारवर आणखी एक मोठं संकट; गृहमंत्री बदलणार की मुंबई पोलीस आयुक्त?

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का? राज्याचे संयमी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं विधान

(jayant patil first reaction on anil deshmukh’s ministry)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.