वाझेप्रकरणी ठाकरे सरकारवर आणखी एक मोठं संकट; गृहमंत्री बदलणार की मुंबई पोलीस आयुक्त?

पूजा चव्हाण ते सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांना अपयश आल्याने देशमुख यांना गृहमंत्रीपदावरून हटवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Is Param Bir Singh or anil deshmukh likely to be sacked?)

वाझेप्रकरणी ठाकरे सरकारवर आणखी एक मोठं संकट; गृहमंत्री बदलणार की मुंबई पोलीस आयुक्त?
परमबीर सिंग, अनिल देशमुख

मुंबई: पूजा चव्हाण ते सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांना अपयश आल्याने देशमुख यांना गृहमंत्रीपदावरून हटवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशमुख यांना हटवून त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे गृहमंत्री बदलण्याऐवजी मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे राज्याला नवा गृहमंत्री मिळणार की मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी होणार? हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. (Is Param Bir Singh or anil deshmukh likely to be sacked?)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी सचिन वाझे प्रकरणावर चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना हटवण्याच्या चर्चा सुरू झाल्या. दुपारनंतर अनिल देशमुख यांचं गृहमंत्रीपद काढून घेण्याच्या चर्चांना अधिकच जोर चढला. देशमुख यांच्या ऐवजी अजित पवार किंवा जयंत पाटील यांच्याकडे हे पद सोपविण्याच्या हालचाली सुरू असल्याचंही सांगण्यात आलं. अनिल देशमुख हे राज्यातील अनुभवी नेते आहेत. त्यांना मंत्रिपदाचा दीर्घकाळ अनुभव आहे. मात्र, आघाडी सरकार चालवताना निर्णय घेताना दिरंगाई होत असतो, त्यामुळे देशमुख यांना बदललं जाईल असं वाटत नाही, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

अजितदादा आणि जयंत पाटील

अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. तात्काळ निर्णय घेण्यासाठी ते परिचित आहेत. शिवाय ते अनुभवी मंत्री आणि नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्याचा राष्ट्रवादीत विचार सुरू आहे. अजित पवार यांचे विरोधकांशी संबंध चांगले असल्याने या अजितदादांकडे हे खातं गेल्यास विरोधकां या खात्याला टार्गेट करणं थांबवतील. त्यामुळे अजितदादांकडे हे पद देण्याचं राष्ट्रवादीत घटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, अजितदादांकडे उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद असल्याने जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद द्यावे असंही राष्ट्रवादीच्या एका गटाचं म्हणणं आहे. जयंत पाटील यांनी यापूर्वीही गृहमंत्रीपद सांभाळलेलं असल्याने त्यांच्याकडे हे पद द्यावं, अशी मागणी होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राष्ट्रवादीच्या बैठकीकडे लक्ष

आज दुपारी 4 वाजता राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. यावेळी गृहमंत्री बदलाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, शरद पवार याबाबत काय निर्णय घेतात, यावरच देशमुख यांच्या गृहमंत्रीपदाचं भविष्य ठरणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

राजकीय नेत्याचा बळी की अधिकाऱ्याचा?

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या काही तास बैठक चालली. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही मुख्यमंत्र्यांच्या भेट घेत आहेत. वाझे प्रकरणी ठाकरे सरकारची चांगलीच अडचण झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री बदललं जाण्याची जोरदार चर्चा आहे. अनिल देशमुख यांच्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या नेत्याकडे हे खातं दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पण देशमुखांना बदललं जाणार की मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग हे मात्र निश्चित होऊ शकलं नाही. एनआयएचा तपास हा सरकारच्या गळ्याचा फास बनत चालला आहे. त्यामुळेच वाझे प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांवरही गाज पडू शकते अशीही चर्चा आहे. शेवटी सरकार राजकीय राजकीय नेत्याचा बळी देणार की अधिकाऱ्याचा हे महत्वाचं आहे. पण जोरदार चर्चा आहे हे निश्चित. (Is Param Bir Singh or anil deshmukh likely to be sacked?)

 

संबंधित बातम्या:

वाझे सट्टेवाल्यांकडून खंडणी उकळतो पण तो पुढे कुणाला देतो?; नितेश राणेंचा गंभीर आरोप

मोठी बातमी: सचिन वाझेंची प्रकृती पुन्हा खालावली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवले

LIVE | पोलीस आयुक्त बदलणार की गृहमंत्री? वाझे प्रकरणी मोठ्या घडामोडींची शक्यता बळावली

(Is Param Bir Singh or anil deshmukh likely to be sacked?)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI