Maratha Andolan : मराठा आंदोलनाला मोठे यश; वर्षाराणी दळवे ठरल्या पहिल्या मराठा कुणबी सरपंच

Maratha Kunbi Sarpanch : मराठा आंदोलनाला मोठे यश आल्याचे दिसून आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील कुंभारी इथं वर्षाराणी दळवे या राज्यातील पहिल्या मराठा कुणबी सरपंच ठरल्या आहेत.

Maratha Andolan : मराठा आंदोलनाला मोठे यश; वर्षाराणी दळवे ठरल्या पहिल्या मराठा कुणबी सरपंच
मराठा कुणबी पहिल्या सरपंच
Image Credit source: गुगल
| Updated on: May 31, 2025 | 11:40 AM

Varsharani Dalve : गेल्या दहा वर्षांत मराठा आरक्षणासाठी राज्याने अनेक आंदोलनं पाहिली. पण अद्यापही मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. पण राज्य सरकारच्या काही तरतुदीची फळं आता या समाजाला मिळत असल्याचे दिसून येत आहे. मराठा आंदोलनाला मोठे यश आल्याचे दिसून आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील कुंभारी इथं वर्षाराणी दळवे या राज्यातील पहिल्या मराठा कुणबी सरपंच ठरल्या आहेत. तुळजापूर तालुक्यातील कुंभारी हे गाव आहे. मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनानंतर वर्षाराणी सत्यवान दळवे यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान हे मराठा आंदोलनाला आलेले यश असल्याची प्रतिक्रिया समाजातून उमटत आहे.

वर्षाराणी दळवे मराठा कुणबी सरपंच

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शिंदे समितीकडून कुणबी नोंदी शोधण्याचे काम हाती घेण्यात आलं. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पोखरापूर येथील वर्षाराणी सत्यवान दळवे यांची कुणबी मराठा नोंद सापडली. त्यानंतर त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं. माहेरी मिळालेल्या मराठा कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी सासरी तुळजापूर येथील कुंभारी गावात रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दाखल केली होती. शुक्रवारी सरपंच निवडीसंदर्भातील बैठक झाली. त्यावेळी वर्षाराणी दळवे या बिनविरोध निवडून आल्या.

पोटनिवडणुकीत विजय

पोखरापूर येथील वर्षाराणी सत्यवान दळवे यांची कुणबी मराठा नोंद सापडली. त्यांचे सासरकडील नाव वर्षाराणी संतोष वडणे असे आहे. त्यानंतर त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं. माहेरी मिळालेल्या मराठा कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे वर्षाराणी दळवे यांनी कुंभारी येथे पोटनिवडणूक लढवली. कुंभारी गावात रिक्त झालेल्या सरपंच पदावर इतर मागास प्रवर्गातून लढत त्यांनी विजय मिळवला.
त्यांची सरपंच म्हणून निवड झाली. शुक्रवारी 30 मे रोजी झालेल्या बैठकीत सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. मराठा आंदोलनानंतर त्या मराठा कुणबी पहिल्या महिला सरपंच असल्याचं सांगितले जाते. सकल मराठा समाजाकडून तुळजापुरात त्यांचा जंगी सत्कारही करण्यात आला. त्यांच्या माहेरी पण या निवडीबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला आहे.