Laxman Hake : संध्याकाळी बारामतीत येतोय..लक्ष्मण हाके यांचे राष्ट्रवादीला ते ओपन चॅलेंज काय?
Laxman Hake Open Challenge NCP : सध्या लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादीत चांगलीच शिलगली आहे. हाके यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांवर टीका केल्यापासून हा वाद पेटला आहे. त्यातच सुरज चव्हाण यांच्या इशाऱ्यानंतर हाके यांनी राष्ट्रवादीला ओपन चॅलेंज दिले आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अर्थखात्यावरून निशाणा साधला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटातून हाकेंवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी हाके हे देशी दारुचे ब्रँड अँम्बेसिडर आहे, अशी जिव्हारी लागणारी टीका केली. तर त्यांना धडा शिकवण्याची भाषा केली होती. त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीला थेट खुले आव्हान दिले आहे. काय म्हणाले हाके?
आज बारामतीत, आडवून दाखवा
ओबीसी नेते लक्ष्मण हाके पंढरपूर येथे असताना त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. मी रोज दोन ते तीन जिल्ह्याची बॉर्डर पार करतोय. सुरत चव्हाण यांच्या अंगात जर फार खुमखुमी असेल तर सुरज चव्हाण आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यात दम असेल तर मी आज संध्याकाळी बारामतीत येतोय. मला अडवून दाखवावं असं चॅलेंज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलं आहे.
सुरज चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल
हाके यांनी सुरज चव्हाण यांच्यावर पण जोरदार हल्लाबोल चढवला. तुझा नेता दारूच्या कारखान्याचा मालक आहे. मग तुझा ब्रँड सांगायचा का? असा सवाल त्यांनी केला. सुरज चव्हाण प्रश्नावर बोला आम्ही फक्त निधी मागतोय तुम्ही काय वैयक्तिक टीका करताय, असे हाके म्हणाले. अजितदादा असली पिल्लावळ माझ्यावर बोलायला सोडताय मग तुमचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे अशी खोचक टीका लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर केली. अजितदादा यांना आचार विचार कुठला इजम नाही जो सत्तेत येईल तिकडे तुम्ही जाता अजितदादा जनतेला वेढ्यात काढू नका आणि तुमच्या पिल्लावळीला आवरा आज मी बारामतीत येतोय पाठवा तिकडे आडवायला, असे खुले आव्हान त्यांनी दिले.
अजितदादांना दिला विपश्यना करण्याचा सल्ला
गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांना फिजिकली प्रॉब्लेम आहेत तसेच एखाद्या माणसाला मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो त्याच बरोबर त्यांची राजकीय कारकीर्द संपते त्यावेळी विपशयने सारखा मार्ग स्वीकारला तर राजकारणातल्या अनेक राजकीय लोकांनी विपशयने सारखा मार्ग स्वीकारला पाहिजे. नेहमी सत्तेत कशासाठी पहाटे पहाटे जाऊन शपथ विधी करता त्यामुळे थोडंसं ध्यानधारणा विपशयना झालीच पाहिजे असे म्हणतं हाके यांनी पवारांवर निशाणा साधला.
कोकाटे यांच्यावर पण टीका
अजितदादांचा कुठलाही माणूस काढा वादग्रस्त बोलण्याशिवाय त्यांना काही जमत नाही कारण ही माणसं मुंबईत बसून शेतकर्यांचे ओबीसींचे कष्टकऱ्यांचे टाळूवरचे लोणी खाण्याचे काम करत असतात कारण त्यांचा नेताच तसा आहे अशी टीका लक्ष्मण हाके यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर केली.
