AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी स्वतःहून पक्ष सोडला नाही, तर देवेंद्र फडणवीस यांनी… राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचा तो मोठा गौप्यस्फोट

Pratap Patil Chikhalikar : नांदेड जिल्ह्यात काही नेत्यांमध्ये विस्तव सुद्धा जात नाही. त्यातच ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा विळी-भोपळ्याचे वैर सर्वांनाच माहिती आहे. चिखलीकरांनी आता मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मी स्वतःहून पक्ष सोडला नाही, तर देवेंद्र फडणवीस यांनी... राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचा तो मोठा गौप्यस्फोट
प्रताप पाटील चिखलीकरांचा गौप्यस्फोटImage Credit source: गुगल
| Updated on: May 31, 2025 | 10:03 AM
Share

मराठवाड्यातील नांदेडमध्ये काही नेत्यांमध्ये विस्तव सुद्धा जात नाही. राजकीय आघाड्या-बिघाड्यांनी गेल्या तीन-चार वर्षात राज्याचे राजकारण पुरतं बदलून गेले आहे. युती-महायुती, महाविकास आघाडीच्या प्रयोगाने कोण कुणाच्या बाजूने आहे हे काही लवकर लक्षात येत नाही. त्यातच विधानसभेसाठी राजकीय सोय म्हणून काहींनी मित्र पक्ष जवळ केल्याचे समोर आले आहे. हे नेते मित्र पक्षात असले तरी ते भाजपाच्या विचारधारेशीच कटिबद्ध असल्याचे दिसून येते. ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा विळी-भोपळ्याचे वैर सर्वांनाच माहिती आहे. चिखलीकरांनी आता मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मी स्वतःहून पक्ष सोडला नाही

राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाविषयी मोठे वक्तव्य केले आहे. विधानसभेसाठी जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी महायुतीत मित्र पक्षांनी एकमेकांना सांभाळून घेतल्याचे त्यांच्या एका वक्तव्यावरून समोर आले आहे. चिखलीकरांच्या या वक्तव्याने त्यावेळची समीकरणं समोर आली आहे. मी स्वत:हून पक्ष सोडला नाही, एड्जस्टसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मला राष्ट्रवादी पाठवलं, असा गौप्यस्फोट आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला. तसे हे उघड गुपित आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रेमात, लढाईत आणि राजकारणात सर्व काही माफ असतं अस म्हणतात ते काही वावगं नाही.

अशोकराव लीडर नाही डीलर…

काँग्रेस सोडून भाजपामध्ये स्थिरस्थावर झालेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे आणि चिखलीकरांचे राजकीय वैर सर्वांनाच माहिती आहे. त्या दोघांमध्ये विस्तव जात नाही. चिखलीकर त्यांच्यावर तोंडसुख घेण्याची संधी सोडत नाहीत. चिखलीकरांनी यापूर्वी सुद्धा अशोकरावांवर अनेकदा टीका आणि गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या भाजपा प्रवेशासाठी आपण आग्रही होतो असे ते म्हणत असले तरी, टीकेची संधी मात्र ते सोडत नाहीत.

देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्री असतांना ( 2019 ) सांगितलं होतं अशोकराव लीडर नाहीत डीलर आहेत. फडणवीस यांच जूनं वक्तव्य काढून आमदार चिखलीकर यांचा अशोकराव चव्हाण यांना पुन्हा एकदा टोला लगावला. अमित शहा यांच्या उपस्थित डी. पी. सावंत यांचा फेरपक्ष प्रवेश झाला. माजी मंत्री डी. पी सावंत यांच्या पक्ष प्रवेशावरून आमदार चिखलीकर यांनी टीका केली.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा