सत्तेत असताना मदरसे बंद करावेसे वाटले नाहीत का; इम्तियाज जलीलांचा भाजपला सवाल

| Updated on: Oct 18, 2020 | 1:02 PM

महाराष्ट्राचे महासचिव शहानवाज खान यांना आजपासून पदभार देण्यात आला.

सत्तेत असताना मदरसे बंद करावेसे वाटले नाहीत का; इम्तियाज जलीलांचा भाजपला सवाल
गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज जलील यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे जलील यांनी कोरोना चाचणी करवून घेतली होती.
Follow us on

नवी मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका तर दुसरीकडे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं. अशात एमआयएम (MIM) पक्षाची पकड घट्ट करण्यासाठी पक्षात महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे महासचिव शहानवाज खान यांना आजपासून पदभार देण्यात आला. यावेळी अनेक बड्या नेत्यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी विरोधी पक्ष भाजपवर घणाघाती टीका केली आहे. (mim imtiaz jaleel criticized on bjp in navi mumbai)

देशात गंभीर प्रश्न असताना त्यावरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी भाजप, आरएसएस बजरंग दल एक सुनियोजित कट रचून देशात हिंदू, मुस्लिम असे धार्मिक प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची जहरी टीका इम्तियाज जलील यांनी यावेळी केली. एमआयएम प्रणित विद्यार्थी आघाडीच्या प्रथम वर्धापन दिनानिमीत्त नवी मुंबई कामोठमध्ये प्रशिक्षण शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, भाजप मुळ मुद्द्यापासून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, देशातील जनता मूर्ख नसून सुज्ञ बनत चालली आहे. त्यामुळे भाजपच्या असल्या भूलथापांना यापुढे बळी पडणार नाही असं वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केलं. (mim imtiaz jaleel criticized on bjp in navi mumbai)

मागील पाच वर्षे राज्यात भाजपचं सरकार होतं. मात्र, तेव्हा यांना मदरसे बंद करावेसे वाटले नाहीत आणि आता सत्ता नाही तर राज्यातील मदरसे बंद करा असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. त्यामुळे भाजप मूळ मुद्दे सोडून दुसऱ्याच मुद्द्यांना हात घालत आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे त्यांनी मदरसे बंद करून दाखवून द्यावं. नाहक नागरीकांचे लक्ष विचलित करू नये असं देखील जलील यांनी सुनावलं.

दरम्यान, यावेळी व्यासपीठावर माजी आमदार वारीस पठाण, फैयाज अहमद, महासचिव शाहनवाज खान, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डा.कुणाल खरात, प्रभाकर पारधे, शहजाद खान, प्रशांत वाघमारे, रुमान राझवी, सानीर सय्यद, मझर पठाण आदी बडे नेते आणि राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधीकारी उपस्थित होते.

इतर बातम्या –

म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, सोमवारपासून लागू होणार नवा नियम

मुंबईत उद्यापासून मेट्रो सुरु; जाणून घ्या काय असतील नियम

(mim imtiaz jaleel criticized on bjp in navi mumbai)